🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगली जिल्हा बँक निवडणूक: महायुतीचे ‘डॅमेज कंट्रोल’ अन् MVA ची फिल्डिंग; जयंत पाटील,विशाल पाटील,विश्वजित कदमांच्या बैठकीत रणनीती निश्चित ​

सांगली जिल्हा बँक निवडणूक: महायुतीचे ‘डॅमेज कंट्रोल’ अन् MVA ची फिल्डिंग; जयंत पाटील,विशाल पाटील,विश्वजित कदमांच्या बैठकीत रणनीती निश्चित  


सांगली :- सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीची रणधुमाळी सध्या तीव्र झाली आहे. नोकरभरती आणि बँकेच्या कार्यपद्धतीवर भाजपकडून सातत्याने आक्षेप घेतले जात असल्याने, महाविकास आघाडीने आता अत्यंत खबरदारी घेत 'ताकही फुंकून पिण्याची' भूमिका घेतली आहे. या पार्श्वभूमीवर, विरोधकांना मात देण्यासाठी आणि बँकेवरील सत्ता कायम राखण्यासाठी महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी रविवारी सांगलीत एक महत्त्वाची बैठक घेऊन निवडणुकीची रणनीती निश्चित केली आहे.  

​महाविकास आघाडीची ‘जिल्हा परिषद’ पॅटर्नची पुनरावृत्ती

जिल्हा परिषद अध्यक्षांच्या शासकीय बंगल्यावर पार पडलेल्या या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते आमदार जयंत पाटील, काँग्रेसचे खासदार विशाल पाटील आणि आमदार डॉ. विश्वजित कदम मुख्य भूमिकेत होते. या बैठकीला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विक्रमसिंह सावंत आणि सांगली शहर-जिल्हाध्यक्ष देवराज पाटील यांचीही उपस्थिती होती. ज्याप्रमाणे जिल्हा परिषदेमध्ये महायुतीला पराभूत करत महाविकास आघाडीने बाजी मारली होती, त्याच धर्तीवर जिल्हा बँकेतही महायुतीला आऊटस्मार्ट करण्याची रणनीती आखली जात आहे.  

बैठकीतील महत्त्वाचे निर्णय व रणनीती:
जागावाटप आणि प्राथमिक चर्चा: काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने एकत्र येऊन ही निवडणूक पूर्ण ताकदीने लढवण्याचा निर्णय घेतला आहे. प्राथमिक जागावाटपावर सविस्तर चर्चा पार पडली आहे.

​महायुतीतील नाराजांवर गळ: येत्या आठवडाभरात महायुतीमधील नाराज व इच्छुक नेत्यांशी संपर्क साधून त्यांना महाविकास आघाडीत सोबत घेण्याची व्यूहरचना आखण्यात आली आहे. यासंदर्भात पुढील आठवड्यात निर्णय होणार आहे.

​इच्छुकांचा ताळमेळ: महाविकास आघाडीतील इच्छुक उमेदवार आणि महायुतीतून संपर्कात असलेल्या नेत्यांचा योग्य ताळमेळ घालूनच अंतिम जागावाटप जाहीर केले जाणार आहे.
​१८ सप्टेंबरला अंतिम मतदार यादी; रणधुमाळी उडणार

जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी मतदार यादी १८ सप्टेंबर रोजी अंतिम होणार आहे. अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होताच कोणत्याही क्षणी निवडणुकीचा अधिकृत कार्यक्रम आणि बिगुल वाजण्याची शक्यता आहे. भाजपकडून नोकरभरतीचे मुद्दे पुढे करून सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न सुरू असतानाच, महाविकास आघाडीने विरोधी पक्षातील असंतोष आणि स्थानिक गणिते जुळवून रणनीती आखल्याने सांगलीतील सहकार क्षेत्रातील राजकीय वातावरण भलतेच तापले आहे.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.