🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

"निवडणूक आयुक्तांपासून परराष्ट्र मंत्र्यांपर्यंत... 'SIR' च्या नोटीसने राजकीय वर्तुळात भूकंप! एल. के. अडवाणींसह बड्या नेत्यांची नावे यादीत; पाहा नक्की काय घडलं!"

"निवडणूक आयुक्तांपासून परराष्ट्र मंत्र्यांपर्यंत... 'SIR' च्या नोटीसने राजकीय वर्तुळात भूकंप! एल. के. अडवाणींसह बड्या नेत्यांची नावे यादीत; पाहा नक्की काय घडलं!"


नवी दिल्ली: सध्या देशभरात मतदारयादी पडताळणी मोहीम सुरू आहे  मोहीम सुरू आहे. या प्रक्रियेचा उद्देश मतदार यादीतील त्रुटी सुधारणे आणि ती अद्ययावत करणे हा आहे. महाराष्ट्रासह अनेक ठिकाणी एसआयआरनंतर मतदार प्रारुप यादी जाहीर झाली आहे. अनेक मतदारांची नावे वगळल्याने लोकांमध्ये नाराजी आहे. अशातच आता दिल्लीतून मोठी अपडेट समोर आली आहे. दिल्लीत जाहीर झालेल्या प्रारुप यादीनंतर थेट निवडणूक आयुक्तांनाच एसआयआर नोटीस बजावण्यात आली आहे. निवडणूक आयुक्त एस. एस. संधू आणि परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांना एसआयआरची नोटीस बजावण्यात आली आहे.

त्यांच्याशिवाय, भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी, तसेच काँग्रेस नेते कपिल सिबल आणि अभिषेक मनू सिंघवी यांची नावेही या यादीत आहेत. परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांचेही नाव समोर आले आहे. याव्यतिरिक्त, दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या कुटुंबीयांची नावेही या यादीत समाविष्ट असल्याचे वृत्त आहे. 

ज्यामध्ये नोटीस जारी करण्यामागची विशिष्ट कारणे नमूद केली आहेत. यामध्ये नावांच्या स्पेलिंगमधील तफावत ते मागील SIR मधील नोंदींशी नावे जुळली नाहीत, अशा विविध मुद्द्यांचा समावेश आहे. काही प्रकरणांमध्ये नोंदींमधील "तार्किक विसंगती"  असल्याचे कारण दिले आहे. या प्रारुप यादीत नाव असणे म्हणजे संबंधित व्यक्तीला मतदार यादीतून वगळण्यात आले आहे, असा अर्थ होत नाही. तर ही मतदार नोंदींच्या पडताळणी प्रक्रियेचा एक भाग आहे. संबंधित नोंदींबाबत स्पष्टीकरण किंवा पडताळणी सुलभ करण्यासाठी या नोटिसा जारी केल्या जातात ही बाब लक्षात घेणे आवश्यक आहे.


निवडणूक आयुक्तांना एसआयआरची नोटीस का?
नोटीसच्या यादीनुसार, निवडणूक आयुक्त एस. एस. संधू यांना त्यांच्या नावाच्या स्पेलिंगमधील तफावतीमुळे नोटीस बजावण्यात आली आहे. विशेषतः, मतदार यादीत नोंदवलेले नाव आणि इतर उपलब्ध नोंदी यांच्यात तफावत आढळून आली. परिणामी, पडताळणी प्रक्रियेचा एक भाग म्हणून ही नोटीस जारी करण्यात आली. 

नोटीसच्या यादीत नाव असणे हा स्वतःच मतदाराच्या पात्रतेबाबत किंवा स्थितीबाबत कोणत्याही अनियमिततेचा पुरावा नाही. SIR प्रक्रियेदरम्यान नोंदींची परस्पर पडताळणी केली जाते. त्यामुळे जुन्या नोंदी आणि सध्याची माहिती यांच्यात तफावत असलेली प्रकरणे ओळखण्यास मदत होते. 
जयशंकर आणि त्यांच्या पत्नीची नावेही यादीत

परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि त्यांच्या पत्नी के. एस. जयशंकर यांची नावेही नोटीसच्या यादीत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मतदार नोंदींच्या पडताळणीदरम्यान ही नावे समोर आली आहेत. नोटीस जारी करण्यामागचा उद्देश नोंदींमधील माहितीची पडताळणी करणे हा आहे. अशा प्रकरणांमध्ये, उपलब्ध कागदपत्रे आणि विद्यमान नोंदींच्या आधारे स्थिती स्पष्ट केली जाते; त्यामुळे, केवळ नोटीस बजावली जाणे म्हणजे अंतिम निर्णय किंवा निष्कर्ष मानला जाऊ नये.

कपिल सिब्बल आणि मिस्त्री यांना का बजावली नोटीस?
या यादीत काँग्रेस नेते आणि ज्येष्ठ खासदार कपिल सिबल तसेच परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांच्या नावांचा समावेश आहे. जारी केलेल्या नोटीसच्या यादीनुसार, दोन्ही प्रकरणांमध्ये 'विशेष सखोल पुनरावलोकन' (SIR) प्रक्रियेतील जुन्या नोंदींशी नावांची जुळवणी (मॅपिंग) न होणे हे कारण नमूद करण्यात आले आहे. सध्याची माहिती जुन्या नोंदींशी पडताळून पाहणे हा SIR प्रक्रियेचा एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. जर एखादे नाव जुन्या यादीशी थेट जुळत नसेल, तर संबंधित व्यक्तीसोबत पडताळणी प्रक्रिया सुरू केली जाते; या दोन नावांच्या बाबतीतही हेच कारण दिले गेले आहे.
केजरीवाल यांच्या कुटुंबीयांचाही समावेश...

नोटीसच्या यादीत माजी उपपंतप्रधान एल. के. अडवाणी यांची कन्या प्रतिभा अडवाणी यांच्या नावाचाही समावेश आहे. याव्यतिरिक्त, दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची नावेही यात आहेत. राजकीय आणि सार्वजनिक क्षेत्रातील इतर अनेक मान्यवरांची नावेही या यादीत दिसून येतात. काही प्रकरणांमध्ये जुन्या SIR नोंदींशी जुळवणी न झाल्याचे कारण आहे, तर काहींमध्ये नोंदींमधील तार्किक विसंगतींचा उल्लेख आहे.

SIR नोटीसचा अर्थ काय?
'विशेष सखोल पुनरावलोकन' (SIR) दरम्यान, मतदार यादीतील नोंदींची सविस्तर पडताळणी केली जाते. या प्रक्रियेत जुन्या नोंदींशी नावे न जुळणे किंवा स्पेलिंगमधील तफावत यांसारख्या समस्या उद्भवू शकतात, ज्यामुळे नोटीस बजावली जाते. परिणामी, नोटीसच्या यादीत नाव असणे म्हणजे संबंधित व्यक्तीच्या मतदानाच्या पात्रतेबाबतचा अंतिम निर्णय नव्हे; तर ती पडताळणी प्रक्रियेचाच एक भाग आहे. संबंधित नोंदी आणि उपलब्ध माहितीच्या आधारे पुढील कार्यवाही निश्चित केली जाते. या यादीत अनेक बड्या व्यक्तींच्या नावांचा समावेश असल्याने SIR प्रक्रिया पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.