पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी केले मिरजकरांचे कौतुक; प्रभात हेटकाळे यांच्या महात्मा गांधी चौक मंडळाकडून SP दोशींचा सन्मान अन् महाप्रसाद वाटप


​मिरज: "गेल्या काही वर्षांत मिरजवासियांनी पोलिसांना मोलाचे सहकार्य करत नेहमीच शांततेत आणि विनागालबोट गणेशोत्सव साजरा केला आहे. पोलिसांच्या सूचनांचे तंतोतंत पालन करणाऱ्या मिरजकरांनी आणि महात्मा गांधी चौक गणेशोत्सव मंडळाने दिलेले हे सन्मानपत्र आमच्यासाठी अत्यंत मौल्यवान आहे," असे प्रतिपादन पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी केले. 
​गणेशोत्सवाच्या पाचव्या दिवशी महात्मा गांधी चौक गणेश मंडळाच्या वतीने भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी उपस्थित वारकऱ्यांच्या हस्ते पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. त्यानंतर अधीक्षक तुषार दोशी यांच्या हस्ते महाप्रसाद वाटपाचा शुभारंभ करण्यात आला.
अडचणी सोडवणारा माणूस: प्रभात हेटकाळे

या मंडळाची स्थापना सन १९५४ मध्ये झाली असून, आजअखेर सलग ६५ वर्षे या मंडळामार्फत महाप्रसादाचे यशस्वी आयोजन केले जात आहे. सन २००० मध्ये मंडळाचे अध्यक्ष प्रभात हेटकाळे यांनी या पदाची धुरा हाती घेतली आणि मंडळाचा पूर्ण कायापालट केला. सामाजिक कार्यात सतत अग्रभागी असणारे प्रभात हेटकाळे मिरजकरांच्या हाकेला धावणारे नेतृत्व म्हणून ओळखले जातात. गोरगरीब असो वा कोणताही गरजू, मनात कोणतीही समस्या असली की मिरजेत सर्वप्रथम 'प्रभात हेटकाळे' यांचीच आठवण येते. एकदा का कोणताही प्रश्न प्रभातकडे आला की तो सुटलाच म्हणून समजा; 'प्रभात म्हणजे अडचण सोडवणारा माणूस' हेच मिरजकरांचे समीकरण बनले आहे.

​​मान्यवरांची उपस्थिती
या सोहळ्यास मिरजेचे पोलीस उपअधीक्षक अजय कोकाटे, एलसीबीचे निरीक्षक संजीव झाडे, गांधी चौकचे सहायक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे, मिरज शहर पोलीस निरीक्षक किरण चौगले आणि वाहतूक शाखेचे निरीक्षक तिप्पे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

​या कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन मंडळाचे प्रमुख प्रभात हेटकाळे, डॉ. विकास पाटील, धनंजय गडदावर, पप्पू सावंत, अशोक कदम, इम्तियाज पठाण, बंटी समुद्रे, अभिषेक भोसले आणि विनायक शेडबाळे यांनी केले.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.