🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

दिग्दर्शिका सई परांजपे यांना विष्णुदास भावे नाट्य गौरव पदक जाहीर, रंगभूमीदिनी सांगलीत होणार वितरण

दिग्दर्शिका सई परांजपे यांना विष्णुदास भावे नाट्य गौरव पदक जाहीर, रंगभूमीदिनी सांगलीत होणार वितरण


सांगली : यंदाचे प्रतिष्ठेचे विष्णुदास भावे नाट्य गौरव पदक प्रसिद्ध दिग्दर्शिका सई परांजपे यांना जाहीर झाले आहे. सांगलीत अखिल भारतीय नाट्यविद्या मंदिर समितीतर्फे शुक्रवारी ही घोषणा करण्यात आली. रंगभूमीदिनी म्हणजे ५ नोव्हेंबररोजी सांगलीत त्याचे वितरण होईल. नाट्यक्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या रंगकर्मीला प्रतिष्ठेचे विष्णुदास भावे गौरव पदकाने सन्मानित करण्यात येते. गतवर्षी अभिनेत्री नीना कुळकर्णी यांना या पदकाने सन्मानित करण्यात आले होते. 
यंदाचा ५८ वा पुरस्कार नाट्य संमेलनाचे अध्यक्ष, अभिनेते मोहन जोशी यांच्या हस्ते सई परांजपे यांना प्रदान केला जाईल. नाट्यविद्या मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. शरद कराळे यांनी पत्रकार बैठकीत ही माहिती दिली. ते म्हणाले, नाट्, चित्रपट क्षेत्रात परांजपे यांनी विविधांगी कामगिरी बजावली आहे. बालनाट्ये, प्रौढांसाठी व्यावसायिक नाटके, भाषांतरे, हिंदी व पंजाबी नाटके अशी मुशाफिरी त्यांनी केली आहे. या क्षेत्रातील सर्जनशील कामगिरीबद्दल केंद्र सरकारने त्यांना पद्भूषण पुरस्काराने सन्मानित केले आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.