🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

उद्या दारूची दुकाने बंद राहणार! महाराष्ट्रात 'ड्राय डे'चे नियम काय? वाचा एका क्लिकवर

उद्या दारूची दुकाने बंद राहणार! महाराष्ट्रात 'ड्राय डे'चे नियम काय? वाचा एका क्लिकवर


तळीरामांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. उद्या, २ ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंती असल्याने महाराष्ट्रात मद्यविक्री बंद राहणार आहे. त्यामुळे राज्यातील परवानाधारक वाईन शॉप्स, बिअर शॉपी, देशी दारूची दुकाने तसेच मद्यविक्रीची परवानगी असलेल्या हॉटेलमधील परमिट रूम्सना ड्राय डेच्या नियमांचे पालन करावे लागणार आहे.

महाराष्ट्रात मद्यविक्रीवर निर्बंध घालण्यासाठी काही दिवस कायद्यानुसार निश्चित करण्यात आले आहेत. मुंबई प्रोव्हिजन अॅक्ट, १९४९ अंतर्गत परवानाधारक मद्यविक्रीची ठिकाणे विशिष्ट दिवशी बंद ठेवण्याची तरतूद आहे. गांधी जयंती हा त्यापैकी एक महत्त्वाचा दिवस आहे. ऑक्टोबर २०२६ मध्ये २ ऑक्टोबर (गांधी जयंती) आणि २० ऑक्टोबर (दसरा/विजयादशमी) या दिवशी मद्यविक्रीवर बंदी राहण्याची नोंद आहे.

का लागू केला जातो ड्राय डे?
ड्राय डेचा मुख्य उद्देश संबंधित राष्ट्रीय, धार्मिक किंवा सार्वजनिक महत्त्वाच्या दिवसांमध्ये कायदा-सुव्यवस्था राखणे, मद्यविक्रीमुळे उद्भवणारे अनुचित प्रकार टाळणे आणि प्रशासनाला गर्दीच्या काळात परिस्थितीवर नियंत्रण ठेवणे हा आहे. 

त्यामुळे २ ऑक्टोबरला मद्यविक्री बंद राहणार असल्याने तळीरामांनी याची नोंद घ्यावी. तसेच दसऱ्याच्या दिवशी लागू असलेल्या स्थानिक आदेशांची माहिती संबंधित जिल्हाधिकारी किंवा राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून तपासणे महत्त्वाचे ठरणार आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.