🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

कंपनीचा दावा सिद्ध होऊनही अधिकृतता सिद्ध न झाल्याने आरोपीची निर्दोष मुक्तता

कंपनीचा दावा सिद्ध होऊनही अधिकृतता सिद्ध न झाल्याने आरोपीची निर्दोष मुक्तता


सांगली : ऊस तोडणी मशीनसाठी घेतलेल्या आगाऊ रकमेच्या परतफेडीसाठी दिलेला ₹२ लाख ८७ हजार ३६६ रुपयांचा धनादेश अनादरित झाल्याप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या कलम १३८, निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स ॲक्टच्या खटल्यात किरण अशोकराव शिंदे यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली.

सांगलीचे अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी यांनी दि. २८ सप्टेंबर २०२६ रोजी हा निर्णय दिला. तक्रारदार कंपनीने आरोपीकडून ₹२० लाख आगाऊ रक्कम देण्यात आल्याचे व त्यातील ₹२,८७,३६६ रुपये बाकी असल्याने त्याबाबतचा धनादेश देण्यात आल्याचा दावा केला होता. धनादेश “Funds Insufficient” या कारणाने अनादरित झाल्यानंतर कायदेशीर नोटीस देऊन आरोपीविरुद्ध फौजदारी तक्रार दाखल करण्यात आली होती. न्यायालयाने धनादेश, त्याचा अनादर आणि नोटीसची कायदेशीर प्रक्रिया याबाबत तक्रारदाराचा पुरावा ग्राह्य धरला. तसेच आरोपीकडून निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स ॲक्टच्या कलम ११८ व १३९ मधील अनुमान प्रभावीपणे खोडून काढले गेले नसल्याचेही नमूद केले.

मात्र, कंपनीच्या वतीने तक्रार दाखल करणारे फिर्यादी यांना कंपनीच्या संचालक मंडळाने थेट फिर्याद देण्यास आणि खटला चालविण्यास अधिकृत केल्याचा ठोस ठराव न्यायालयासमोर सादर करण्यात आलेला नव्हता. Vice President यांना स्वतःला अशी सत्ता Board Resolution द्वारे प्राप्त झाली होती, याचाही आवश्यक पुरावा रेकॉर्डवर नसल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आले. 

त्यामुळे कंपनीच्या वतीने तक्रार चालविण्यासाठी आवश्यक असलेले वैध प्राधिकरण सिद्ध झाले नसल्याचा महत्त्वपूर्ण निष्कर्ष न्यायालयाने नोंदविला. NI Act कलम १४२(१)(a) च्या अनुषंगाने तक्रारीतील ही त्रुटी कायम राहिल्याने आरोपीला दोषी ठरविता येणार नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. परिणामी, किरण अशोकराव शिंदे यांची कलम १३८ NI Act अंतर्गत निर्दोष मुक्तता करण्यात आली. या प्रकरणात आरोपीच्या वतीने अॅड. कोणार्क पाटील यांनी प्रभावी बाजू मांडली.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.