दिल्ली पोलिसांच्या ताब्यातून सुटका झाल्यानंतर कॉक्रोच जनता पार्टीचे नेते अभिजीत दीपके यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. 'पंतप्रधान म्हणून मोदी हे भारतासाठी लाजिरवाणे आहेत. या देशाने यापूर्वी इतका भ्याड आणि दादागिरी करणारा नेता कधीच पाहिला नाही,' अशा शब्दांत दीपके यांनी मोदींवर निशाणा साधला. ११ ऑक्टोबर रोजी 'एक्स'वर पोस्ट करत त्यांनी आपली भूमिका मांडली.
दीपके यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले, "Modi, as PM, is an embarrassment to India. Never has this country seen a bigger coward and bully." त्यांच्या या विधानातून त्यांनी पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वावर टीका केली आहे. त्यांच्या पोस्टची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉक्रोच जनता पार्टीने दिल्लीमध्ये आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनात सहभागी होण्यासाठी मुंबईहून दिल्लीला पोहोचलेल्या अभिजीत दीपके, सौरव दास आणि आशुतोष रांका यांना दिल्ली पोलिसांनी शनिवारी विमानातूनच ताब्यात घेतले होते. त्यानंतर या तिघांना दिल्ली कॅन्ट पोलीस ठाण्यात नेण्यात आले आणि कार्यकारी दंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले. पुढे विशेष न्याय दंडाधिकाऱ्यांसमोर झालेल्या प्रक्रियेनंतर तिघांची सशर्त सुटका करण्यात आली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.