🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

"महामानवाचा इव्हेंट!" आईच्या निधनावरून आशुतोष रांकांची मोदींवर बोचरी टीका

"महामानवाचा इव्हेंट!" आईच्या निधनावरून आशुतोष रांकांची मोदींवर बोचरी टीका


नरेंद्र मोदी देशाचे सर्वात महान पंतप्रधान बनू इच्छितात. त्यांच्या महानतेचा तर पत्ता नाही, पण एक गोष्ट आपण नक्कीच सांगू शकतो की, ज्या आणीबाणीबद्दल  आपण फक्त ऐकत असलो होतो, ज्या आणीबाणीच्या गोष्टी आपले आई-वडील आपल्याला सांगायचे, गेल्या 72 तासांत नरेंद्र मोदींनी त्या आणीबाणीलाही मागे सोडले आहे, अशी टीका कॉकरोच जनता पार्टीचे नेते आशुतोष रांका  यांनी केली.

काल दिल्लीत कॉकरोच जनता पार्टी मोठे आंदोलन करणार होती. मात्र, त्यापूर्वीच अभिजीत दिपके, आशुतोष रांका आणि सौरव दास यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले होते. मात्र, रविवारी सकाळी त्यांची सुटका करण्यात आली. यानंतर आशुतोष रांका आणि सौरव दास यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन दिल्ली पोलीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आगपाखड केली.  

1975 च्या आणीबाणीतही या देशात ट्रेन्स बंद करण्याची गरज भासली नव्हती. पण हा हुकूमशाहा इतका घाबरलेला आहे, इतका भित्रा आहे की, काल या देशात मोठ्या संख्येने ट्रेन्स रद्द करण्यात आल्या. लाखोंच्या संख्येने देशवासीयांना त्रास देण्यात आला. गेल्या ७२ तासांत या देशात अशा अनेक गोष्टी घडल्या आहेत, ज्या कदाचित स्वतंत्र भारताच्या इतिहासात आजपर्यंत घडलेल्या नाहीत, असे आशुतोष रांका यांनी म्हटले. 

काल अभिजीत दिपकेच्या आजीचे निधन झाले. त्याला या गोष्टीची माहिती देण्यात आली तेव्हा दिल्ली पोलिसांना माणुसकी नसलेला चेहरा दिसून आला. दिपकेला आजीच्या निधनाची बातमी देण्यात आली तेव्हाही पोलीस तिकडे कॅमेरा आणि माईक घेऊन उभे होते. दिपके वारंवार सांगत होता, माझे पालक लगेच घाबरतात, त्यांना हृदयविकाराची व्याधी आहे. मला माझ्या भावाशी बोलू दे. पण दिल्ली पोलिसांनी माणुसकी दाखवली नाही. एखाद्याच्या जवळचा माणूस गेल्यावरही दिल्ली पोलीस अशाप्रकारे वागतात. आज पोलिसांनी सोडल्यावर अभिजीत दिपके आपल्या आजीच्या अंत्यसंस्कारासाठी गावी गेला आहे. अभिजीत दिपकेला ही खासगी गोष्ट सार्वजनिक करायची नव्हती. त्याला आपल्या दु:खद प्रसंगाचा तमाशा करायला आवडत नाही. आपल्या महामानवाप्रमाणे त्याने केले नाही. त्यांनी आपल्या आईच्या निधनाचाही इव्हेंट करुन टाकला होता. अभिजीत दिपके तसा नाही, असे आशुतोष रांका यांनी म्हटले.

नरेंद्र मोदींनी सिद्ध केले आहे की, राजाचा जीव पोपटात आहे: आशुतोष रांका
एक गोष्ट नक्कीच स्पष्ट झाली आहे की, जी लढाई निवडणूक आयोगाविरुद्ध होती, जी लढाई ज्ञानेश कुमार यांच्याविरुद्ध होती, ती लढाई नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी स्वतःविरुद्ध करून घेतली आहे. नरेंद्र मोदींनी हे स्पष्ट केले आहे की, काहीही करून ते ज्ञानेश कुमार यांचे रक्षण करतील. नरेंद्र मोदींनी सिद्ध केले आहे की, राजाचा जीव पोपटात आहे. आणि हीच गोष्ट आपण पहिल्या दिवसापासून सांगत होतो की, निवडणूक आयोग, ज्याची जबाबदारी या देशातील लोकशाही वाचवण्याची आणि पुढ नेण्याची आहे, तो पूर्णपणे नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या इशाऱ्यावर काम करत आहे, पूर्णपणे कॉम्प्रोमाइज्ड झालेला आहे आणि फक्त आणि फक्त भाजपला जिंकवण्यासाठी ज्ञानेश कुमार मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून काम करत आहेत. काल तुम्ही सर्व लोकांनी पाहिले की कशा प्रकारे फ्लाईटमध्ये घुसून मला, सौरभला आणि दीपकेला किडनॅप करण्यात आले, अशी टीका आशुतोष रांका यांनी केली.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.