🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

LIC मधील नोकरीची 'ही' संधी सोडू नका, वर्षाला 14 लाखांचे पॅकेज

LIC मधील नोकरीची 'ही' संधी सोडू नका, वर्षाला 14 लाखांचे पॅकेज


एलआयसी हाऊसिंग फायनान्स लिमिटेड (LIC HFL) या नामांकित संस्थेने मार्केटिंग आणि सेल्स  विभागासाठी 'मॅनेजमेंट ट्रेनी' पदांच्या 50 जागांसाठी भरती जाहीर केली आहे. हा एक वर्षाचा मॅनेजमेंट ट्रेनिंग प्रोग्राम असून, ठरवून दिलेल्या निकषांची यशस्वी पूर्तता करणाऱ्या उमेदवारांना प्रशिक्षण कालावधीनंतर कंपनीत नियमित सेवेत सामावून घेतले जाईल. या भरतीसाठी एमबीए  पदवी पूर्ण केलेले फ्रेशर्स किंवा कमाल एक वर्षाचा विक्री क्षेत्रातील अनुभव असलेले उमेदवार अर्ज करू शकतात. तसेच, अर्जदार जाहिरातीत दिलेल्या संबंधित 35 शहरांपैकी एका ठिकाणचा रहिवासी असावा आणि त्याला स्थानिक भाषेचे उत्तम ज्ञान असणे आवश्यक आहे.

वार्षिक 14 लाखांचे पॅकेज
या एक वर्षाच्या प्रशिक्षण कालावधीत उमेदवारांना दरमहा 40,000 ते 50,000 मानधन  दिले जाईल. प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण करून कंपनीत समाविष्ट झालेल्या उमेदवारांना वार्षिक 14 लाख रुपये किंवा त्याहून अधिक सीटीसी पॅकेज मिळेल. ही नियुक्ती तात्काळ प्रभावाने होणार असून, रुजू झाल्याच्या तारखेपासून उमेदवारांना किमान दोन वर्षांचा सर्व्हिस बाँड  पूर्ण करणे बंधनकारक असेल. या नोकरीदरम्यान दर महिन्याचा दुसरा आणि चौथा शनिवार सुट्टीचा असेल.
'असा' करा अर्ज

या पदांसाठी अर्ज प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने आयोजित करण्यात आली असून, इच्छुकांनी 'इंटर्नशाला' (Internshala) पोर्टलवरून अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवारांना इंटरनशालावर खाते (Account) तयार करून आपली प्रोफाईल पूर्ण करावी लागेल आणि त्यानंतर 'Apply now' वर क्लिक करून विचारलेल्या अतिरिक्त प्रश्नांची उत्तरे देऊन फॉर्म सबमिट करावा लागेल. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 25 ऑक्टोबर 2026 ही आहे.

अशी पहा संपूर्ण जाहिरात
संस्थेच्या नियमांनुसार ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर मिळणारे समावेशन आणि सीटीसी हे उमेदवाराच्या कामगिरीवर आणि ठरवलेल्या निकषांवर अवलंबून असेल. तसेच सर्व्हिस बाँडची रक्कम व इतर अटी याविषयीची सविस्तर माहिती उमेदवारांनी ऑफर लेटर स्वीकारण्यापूर्वी कंपनीकडून स्पष्ट करून घ्यावी. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी मुदतीपूर्वी आपला अर्ज सबमिट करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. संपूर्ण जाहिरात पाहण्यासाठी संस्थेच्या अधिकृत वेबसाईटला (www.lichousing.com) भेट द्या.





➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.