🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

जगातली पहिलीच अजब घटना! भारतीय तरुणीच्या डोळ्यामध्ये उगवला दात; डॉक्टरांना बसला आश्चर्याचा धक्का.

जगातली पहिलीच अजब घटना! भारतीय तरुणीच्या डोळ्यामध्ये उगवला दात; डॉक्टरांना बसला आश्चर्याचा धक्का.


भारताच्या आरोग्यविषय सेवांच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच एक अत्यंत दुर्मिळ प्रकरण समोर आलं असून याची जगभर चर्चा होताना दिसतेय. एका तरुणीच्या चक्क डोळ्यावर दात आला आहे. तांत्रिक भाषेत सांगायचं झालं तर या तरुणीच्या आय सॉकेटवर म्हणजेच भुवयांच्यावरील बाजूला दात उगवल्याचं डॉक्टरांच्या निदर्शनास आलं आहे. ही तरुणी 16 वर्षांची असून तिच्या डाव्या डोळ्याच्या वरच्या भागात विचित्र आकाराचा दात आला आहे.

काय झालं या मुलीसोबत?

या तरुणीच्या डाव्या डोळ्याच्या वरच्या भागामध्ये सूज आल्याचं तिला जाणवलं. मात्र तिला फार दुखत नव्हतं. त्यामुळे तिने आधी याकडे दुर्लक्ष केल्याचं 'न्यूयॉर्क पोस्ट'ने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे. काही काळाने तिला डोळ्यावर छोटी गाठ आली आहे असं वाटलं. मात्र नंतर तिच्या पापणी आणि भुवईच्या दरम्यानच्या त्वचेतून दोन कडक, पांढरे दातासारखे भाग बाहेर येताना दिसले. त्यानंतर मात्र तिने डॉक्टरांची भेट घेतली. डॉक्टरांनी या तरुणीच्या विविध चाचण्या केल्या. यापैकी 'कॉम्प्युटेड टोमोग्राफी' (CT) स्कॅनद्वाच्या निकालामधून डोळ्याच्या खोबणीच्या वरच्या भागात तिथे पूर्ण विकसित झालेला दात उगवल्याचं स्पष्ट झालं. ज्या ठिकाणी हा दात आलाय त्या भागाला वैद्यकीय भाषेत 'सुपीरियर ऑर्बिट' म्हणतात. हे प्रकरण इतकं विचित्र आहे की त्याच्यासंदर्भातील अभ्यासाचा अहवाल 'अमेरिकन अकॅडमी ऑफ ऑप्थॅल्मोलॉजी'मध्ये प्रकाशित करण्यात आला आहे.

या प्रकाराला म्हणतात 'एक्टोपिक टूथ'; पण याचा अर्थ काय?

या दुर्मिळ प्रकाराला 'एक्टोपिक टूथ' असे म्हणतात. दात तोंडात न उगवता शरीराच्या चुकीच्या ठिकाणी विकसित होतो किंवा चुकीच्या भागातून बाहेर येतो. वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, इतिहासात पहिल्यांदाच अशा विशिष्ट ठिकाणी 'एक्टोपिक टूथ' आढळला आहे. या अभ्यासासंदर्भातील अहवालाच्या सह-लेखिका डॉ. मेघना तन्वर यांनी सदर केसबद्दल माहिती दिली. "डोळ्याच्या खोबणीच्या वरच्या भागात (सुपीरियर ऑर्बिट) आढळलेला हा अशा प्रकारचा पहिला आणि एकमेव 'एक्टोपिक टूथ' आहे," असं तन्वर म्हणाल्या. 




असं कशामुळे घडू शकतं?

तोंडाच्यावरील बाजूला किंवा नाकपुड्यांच्या आत खोलवर अशाप्रकारे दात आढळणे दुर्मिळ असले, तरी कधीकधी असे घडू शकते. पूर्वी झालेल्या दुखापतींमुळे कधीकधी नाकाच्या पोकळीत दात उगवल्याचे प्रकार समोर आले आहेत, परंतु डोळ्याच्या खोबणीत दात आढळणे ही एक अभूतपूर्व घटना असल्याचं सांगितलं जात आहे. संशोधक अजूनही हे शोधण्याचा प्रयत्न करत आहेत की या तरुणीसोबत असे का घडले. या मुलीच्या चेहऱ्याला कधीही, कोणतीही दुखापत किंवा कोणताही अनुवांशिक विकार नव्हता तरीही तिच्या डोळ्यावर दात कसा आला? याचं उत्तर संशोधक शोधत आहेत.

दात काढून टाकला

स्कॅनमधील रिझल्ट्समध्ये या तरुणीच्या कवटीच्या इतर कोणत्याही भागात अतिरिक्त दात दिसलेला नाही. डोळ्यावर आलेला दात हा एकमेव दात केवळ योगायोगाने चुकीच्या ठिकाणी विकसित झाला होता. डॉक्टरांनी यशस्वी शस्त्रक्रिया करुन हा दात सुरक्षितपणे काढून टाकला. हा दात काढून टाकल्याने मुलीच्या डोळ्यावरील सूज कमी झाली असून तिच्या डोळ्याला कोणताही धोका नाहीये.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.