🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

​"जरांगेंनी पिंपरी-चिंचवडमध्ये माल पटवलाय!" बारसकरांच्या ऑडिओ बॉम्बने खळबळ; राजकीय वर्तुळात गदारोळ!

​"जरांगेंनी पिंपरी-चिंचवडमध्ये माल पटवलाय!" बारसकरांच्या ऑडिओ बॉम्बने खळबळ; राजकीय वर्तुळात गदारोळ!


बीड : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी समोर आणलेल्या 500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरून सध्या राज्यातील वातावरण तापलं आहे. अशातच कीर्तनकार ह. भ. प. अजय महाराज बारसकर यांनी मनोज जरांगे यांच्यावर पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे. मनोज जरांगे यांची ऑडिओ क्लिप माझ्याकडे असा दावा अजय बारसकर यांनी केला आहे. धक्कादायक म्हणजे मागे त्यांनी मनोज जरांगे यांचा वाळू माफिया हा सर्वात मोठा धंदा असल्याचा आरोप केला होता.

पत्रकार परिषदेत बोलताना अजय बारसकर म्हणाले की, मनोज जरांगे यांचा फडतूस क्लिप या महाराष्ट्राला दाखवण्याचा हेतू काय? जरांगे यांनी ही क्लिप तुम्हाला आम्हाला दाखवली, पण जरांगे याला पुरावा म्हणत नाही, ते कुजबुज म्हणतात. जरांगे यांनी ही कुजबुज ऐकवली, पण याच्यातून काय सिद्ध केलं आणि यातून तुमचा हेतू काय? हेतू स्पष्ट करा ना, असे आवाहन बारसकर यांनी केले.

अजय बारसकर म्हणाले की, मनोज जरांगे यांनी आज एक ऑडिओ क्लिप ऐकवली, पण त्या क्लिपमध्ये काय आहे, त्यावर आपण बोलू. पण मनोज जरांगे यांनी आज जशी क्लिप दाखवली, तशी त्यांच्याबद्दल माझ्या फोनमध्ये एक क्लिप आहे. मनोज जरांगे यांचे दोन जिगरी मित्र आहेत, ते कोण? हे सांगणार नाही.  पण ते दोन मित्र चर्चा करत आहेत की, 'काय राव जरांगेंनी माल पटवलाय, पिंपरी चिंचवड मधला आहे. 




हे सर्व जरांगे यांचे मित्र बोलत आहेत, मी नाही. पांडू तारकच्या वाड्यावर तुम्ही तिथे बंद खोलीमध्ये काय चर्चा करतात? रात्रभर काय चर्चा करता? एकत्र तुम्ही फिरता, दौऱ्यात ती सोबत असते, पुण्यात आलात तर ती सोबत असते, रायगडला सोबत असते. माझ्याकडे सुद्धा क्लिप आहे. पण मी तुमच्यासारखा नाही. माझ्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करा, मग मी ही क्लिप पोलिसांना देईन. कारण एका माय माऊलीचा त्याच्यात उल्लेख आहे, असे अजय बारसकर यांनी स्पष्ट केले. दरम्यान, अजय बारसकर यांच्या या दाव्यावर मनोज जरांगे काय उत्तर देतात, हे पाहावे लागेल.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.