🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

एक आमदार, १७०० मतदार अन् धडाकेबाज एन्ट्री! पुणे पदवीधर निवडणुकीत दिलीप मानेंच्या शक्तीप्रदर्शनाने उडवली विरोधकांची झोप!

एक आमदार, १७०० मतदार अन् धडाकेबाज एन्ट्री! पुणे पदवीधर निवडणुकीत दिलीप मानेंच्या शक्तीप्रदर्शनाने उडवली विरोधकांची झोप!


महाराष्ट्र विधान परिषदेच्या तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीसाठीची मतदान प्रक्रिया आज (शुक्रवार, 23 ऑक्टोबर) पार पडणार आहे. सकाळी 8 ते सायंकाळी 4 या वेळेत मतदानाची प्रक्रिया पार पडणार असून, पाच जागांसाठी एकूण 182 उमेदवार निवडणूक रिंगणात असून त्यांचं भवितव्य आज मतपेटित कैद होणार आहे. यात पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर विभागातील पदवीधर मतदारसंघ, तसेच अमरावती आणि पुणे विभागातील शिक्षक मतदारसंघांसाठी ही निवडणूक होत आहे. दरम्यान, पाचही मतदारसंघांसाठी प्रशासनाने जय्यत तयारी केल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. 

तर पाचही मतदारसंघांसाठी दोन हजार 419 मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली असून 10 लाख 68 हजार 72 मतदार आज आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. तर आज सोलापुरात पुणे शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीसाठी भाजप नेते दिलीप माने यांनी सामूहिक मतदान केले. दिलीप माने यांच्या BMIT शिक्षण संस्थेतील 1700 मतदार एकत्रित मतदानाला जाताना दिसून आले. माजी आमदार दिलीप माने हे काही महिन्यापूर्वी भाजपात गेले आहेत. शिक्षण संस्थेतील सर्व मतदार घेऊन दिलीप माने मतदानाला मार्गस्थ झाले. पुणे शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीसाठी भाजप नेते दिलीप माने यांनी सामूहिक मतदान केले. दिलीप माने यांच्या बीएमआयटी शिक्षण संस्थेतील 1700 मतदारांचे मतदान पार पडलं शिक्षण संस्थेतील सगळे मतदार घेऊन दिलीप माने मतदानासाठी रवाना झाले. 




माजी आमदार दिलीप माने काही महिन्यांपूर्वीच ते भाजपामध्ये आलेले आहेत. यावेळी प्रतिक्रिया देताना दिलीप माने म्हणाले की, ते आता या निवडणुकीला शिवसेनेच्या उमेदवाराला किती मत पडले हे कळतील, उभा राहायला नको होतं एकत्र मिळून काम करण्याची गरज होती, सगळ्या निवडणुकीमध्ये एकत्र मिळून काम करतोय आपण विधानसभा असूदे, लोकसभा असू दे, ही एक आमदारकीच आहे ना, ती आमदारकीच्या निवडणुकीला कशालाही छोट्या छोट्या गोष्टीसाठी हे करायचं, उमेदवार निवडूनही येत नाही तर मत खायला कशाला उभा करणं हे बरोबर नाहीये, पण झालं आता उभारल्या, निवडणुकासाठी आज मतदान आहे, निश्चितपणे सांगतो की आमचे दोन्ही उमेदवार शिक्षक मतदारसंघात असूदे किंवा पदवीधर मतदारसंघात मोठ्या प्रमाणात निवडून येतील का काही शंका नाही, असंही त्यांनी म्हटलं आहे. 



आता सध्या तरी परिस्थिती अशी आहे की 100% भाजपचे दोन्ही उमेदवार आमचे बहुमताने निवडून येतीलच आणि दोन्हीही आमचे जे कॅडिडेट आहेत, ते दोन्ही कॅडिडेट आमचे युवा आहेत, आणि नक्कीच एक युवा ताकद युवा रक्त हे पुढे जाईल आणि सगळे आमचे जे प्रश्न आहेत, जे सगळे आमचे जे म्हणणे आहेत, ते चांगल्या रीतीने ते मांडू शकतील आज एआयचे जग आहे, नवीन एक कॅडिडेट नवीन एक रक्त पुढे गेल्यामुळे नक्कीच हे प्रश्न त्यांना समजतील व ते त्याप्रमाणे ते मांडू शकतील, जेन झी सुद्धा पाठीशी राहील असं वाटत आमचा कॅडिडेटच जेन झी आहे तर 100% जेन झी देखील त्यांच्या पाठीमागे राहील आणि जेन झीचा हा प्रश्न आहे की त्यांचे प्रश्न ओल्ड लीडर्सला कळत नाही त्यामुळे आमचे जे माननीय मुख्यमंत्री आहेत त्यांनी कॅडिडेटच असं दिलेत की त्यांना प्रश्न कळतील व ते प्रश्न सोडवून घेतील त्यामुळे 100%च दोन्ही कॅडिडेट आमचे निवडून येतील.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.