सरकारी नोकरीच्या शोधामध्ये असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. भारतीय रेल्वेने एनटीपीसी ग्रॅज्युएट भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. या भरती प्रक्रियेअंतर्गत ३५४८ पदं भरली जाणार आहेत. तिकीट सुपरवायझर, सिनिअर क्लर्क, गुड्स ट्रेन मॅनेजर आणि ज्युनिअर अकाऊंट्स असिस्टंट कम टाइपिस्ट या पदांसाठी ही भरती केली जाणार आहे.
रेल्वेने या भरती प्रक्रियेसाठी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, ८ ऑक्टोबरपासून या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. https://www.rrbapply.gov.in या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला अर्ज करता येणार आहे. या भरतीमध्ये सर्वात जास्त २७५० पदं गुड्स ट्रेन मॅनेजरची आहेत. रेल्वेच्या या सर्व पदांवर ज्यांची निवड होणार आहे त्यांना पगार देखील चांगला मिळणार आहे.
या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी किंवा समकक्ष पात्रता पूर्ण केलेली असावी. उमेदवाराने वयाची १८ वर्षे पूर्ण केलेली असावीत. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची कमाल वयोमर्यादा ३३ वर्षे असणे आवश्यक आहे.सर्वसाधारण/EWS उमेदवारांचा जन्म २ जानेवारी १९९४ पूर्वी झालेला नसावा, OBC नॉन-क्रिमी लेयर उमेदवारांचा जन्म २ जानेवारी १९९१ पूर्वी झालेला नसावा आणि SC/ST उमेदवारांचा जन्म २ जानेवारी १९८९ पूर्वी झालेला नसावा, असे रेल्वेकडून सांगण्यात आले आहे.या भरतीप्रक्रियेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया ८ ऑक्टोबर म्हणजे आजपासून सुरू झाली. तर अर्ज करण्याची अंतिम तारीख ६ नोव्हेंबर आहे. महत्वाचे म्हणजे इच्छुक उमेदवारांना अर्जामध्ये दुरूस्ती देखील करता येणार आहे. त्यांना ९ ते १८ नोव्हेंबर या कालावधीत दुरूस्ती करण्याची संधी असेल.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.