🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

"माझी बायको मला परत आणून द्या!"... जिच्या पाठीशी ठाम उभा राहिला, तीच अधिकारी बनून दूर गेल्यावर नवऱ्याचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश

"माझी बायको मला परत आणून द्या!"... जिच्या पाठीशी ठाम उभा राहिला, तीच अधिकारी बनून दूर गेल्यावर नवऱ्याचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश


पाटणा: एक कचोरी, दो समोसा, इन मर्दों का क्या भरोसा.. पुरुषांच्या विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ही घोषणा सोशल मीडियावर व्हायरल झाली. पण एका जोडप्याच्या आयुष्यात नेमकं उलट घडलं आहे. पत्नीचा दुरावा असह्य झाल्यानं तिचा पती मेटाकुटीला आला आहे. पत्नीचं वर्तन अचानक बदलल्यानं पती अक्षरश: मेटाकुटीला आला आहे.

बिहारच्या कटिहारमध्ये राहणाऱ्या हंसलाल यांचा उत्तर प्रदेशात राहणाऱ्या प्रतिभा विश्वकर्मा सोबत प्रेम विवाह झाला. दोघांच्या लग्नाला कुटुंबांनी मान्यता दिली. यानंतर दोघांनी कैमूरमधील नोंदणी कार्यालयातून कागदपत्रंही तयार करून घेतली. लग्नाशी संबंधित दस्तावेजांवर आणि पत्नीच्या नोकरीशी संबंधित कागदपत्रांवरही आपलं नाव असल्याचा दावा हंसलाल यांनी केला.

हंसलाल यांच्या दाव्यानुसार, लग्नानंतर प्रतिभा यांनी अभ्यास सुरू ठेवण्याची आणि पोलीस होण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यांच्या कुटुंबानं प्रतिभाला पूर्ण सहकार्य केलं. अभ्यासाच्या खर्चापासून ते नोकरीच्या तयारीपर्यंत सगळ्यामध्ये कुटुंबियांनी तिला मदत केली. पोलिसांची वर्दी मिळवण्याचं स्वप्न प्रतिभानं पाहिलं होतं. तिच्या स्वप्नासाठी पूर्ण कुटुंब झटलं. पण प्रतिभाला नोकरी लागताच, ती पोलीस होताच परिस्थिती बदलली. पोलीस होण्याचं स्वप्न पूर्ण होताच प्रतिभानं आपल्यापासून आणि आपल्या कुटुंबापासून दूर राहण्यास सुरुवात केल्याचा आरोप हंसलालनं केला. पत्नी अन्य व्यक्तीच्या संपर्कात असल्याचा गंभीर आरोप त्यानं केला. यावर प्रतिभा विश्वकर्मा यांनी अद्याप तरी त्यांची बाजू मांडलेली नाही.

पत्नीपासून दुरावलेल्या हंसलाल सातत्यानं अधिकाऱ्यांकडे मदतीची मागणी करत आहे. मला माझ्या बायकोशी बोलू द्या आणि तिच्याशी बोलू द्या, अशी आर्त साद त्यानं घातली आहे. 'मला माझी प्रतिभा मिळवून द्या,' अशी भावुक मागणी त्यानं केली. यावेळी हंसलाल यांचे वडील परमहंस गुप्तादेखील भावुक झाले. 'पोलीस दलात नोकरी करण्याचं स्वप्न कधीकाळी मी पाहिलं होतं. पण ते पूर्ण होऊ शकलं नाही. सून पोलीस झाल्याचं कळल्यावर संपूर्ण कुटुंबानं आनंद साजरा केला होता. पण आता ती दूर राहू लागल्यानं कुटुंब त्रस्त आहे,' अशी व्यथा परमहंस गुप्ता यांनी मांडली.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.