🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

कोल्हापूर महापालिकेच्या निवृत्त अधिकाऱ्याचा गाव तलावात आढळला मृतदेह; मृत्यूचं कारण अद्याप अस्पष्ट

कोल्हापूर महापालिकेच्या निवृत्त अधिकाऱ्याचा गाव तलावात आढळला मृतदेह; मृत्यूचं कारण अद्याप अस्पष्ट


बोरपाडळे : माले (ता. पन्हाळा) येथील गाव तलावामध्ये माया अशोक कुलकर्णी (वय ६०) या महिलेचा मृतदेह आढळला. याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी की, शनिवारी (ता.३) सकाळी ८.३० पूर्वी गावतलावामध्ये एका महिलेचा मृतदेह तरंगताना दिसला. तो माया कुलकर्णी (रा. माले ता. पन्हाळा) यांचा असल्याचे खात्रीशीर स्पष्ट झाले.
त्या कोल्हापूर महापालिका  नगररचना विभागातून निवृत्त झाल्या होत्या. त्यांच्या मागे मुलगा, बहीण, भाऊ असा परिवार आहे. माया यांच्या मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. कोडोली पोलिस ठाण्यात याची अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे. याबाबतची फिर्याद सविता धनंजय जोशी (रा.कोल्हापूर) यांनी दिली.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.