नवरात्रोत्सवानिमित्त आई तुळजाभवानीची 'भवानी ज्योत' नेण्यासाठी आलेल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील तरुणांना पोलिसांनी शटर बंद करून मारहाण केल्याचा आरोप होत आहे. या घटनेचा आणि पोलिसांसोबत झालेल्या बाचाबाचीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
देवीच्या नवरात्र महोत्सवासाठी हे तरुण तुळजापूर येथील मंदिर परिसरात आले होते. तरुणांनी केलेल्या दाव्यानुसार, ज्योत पेटवताना वापरले जाणारे तेल अंगावर पडल्याच्या कारणावरून वाद निर्माण झाला. याच रागातून पोलिसांनी त्यांना भवानी ज्योत पेटवण्यास मज्जाव केला. त्यानंतर थेट शटर ओढून आपल्याला मारहाण करण्यात आल्याचा गंभीर आरोप या तरुणांनी केला आहे.या कथित मारहाणीनंतर संबंधित तरुण तक्रार नोंदवण्यासाठी पोलीस ठाण्यात पोहोचले. मात्र, पोलिसांनी त्यांची कोणतीही तक्रार दाखल करून घेतली नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. तक्रार न घेतल्याने मंदिर परिसर आणि पोलीस ठाण्यात काही काळ तणावाचे वातावरण पाहायला मिळाले. भवानी ज्योत नेण्यासाठी आलेल्या भक्तांवरच असा प्रसंग ओढवल्याने नागरिकांमधून मोठा संताप व्यक्त केला जात आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.