🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

'एकतर राजीनामा द्या, नाहीतर...': राहुल गांधींचा थेट ज्ञानेश कुमारांना अल्टिमेटम; देशाचा तरुण आता थांबणार नाही!

'एकतर राजीनामा द्या, नाहीतर...': राहुल गांधींचा थेट ज्ञानेश कुमारांना अल्टिमेटम; देशाचा तरुण आता थांबणार नाही!


लोकसभेचे विरोधीपक्ष नेते राहुल गांधी यांनी आज दिल्लीतील इंदिरा भवन येथे विशेष पत्रकार परिषद घेतली. इंडिया आघाडीने आज पुकारलेल्या सुप्रीम कोर्टावरील मोर्चापूर्वी राहुल गांधींनी विरोधकांची भूमिका स्पष्ट केली आहे. या पत्रकार परिषदेमध्ये राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर निशाणा साधतानाच सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी भेट नाकारल्याच्या संदर्भातूनही सूचक विधान केलं.

अधिकारीच माहिती देत असल्याचा दावा
पंतप्रधान मोदींना उद्देशून बोलताना राहुल गांधींनी, "मोदीजी, तुमच्या सरकारमधील 200 अधिकारी आमच्याशी संपर्क साधत आहेत आणि माहिती देत आहेत. ईडी, सीबीआय, परराष्ट्र मंत्रालयातील अधिकारी माहिती पाठवत आहेत," असं विधान केलं. पुढे बोलताना राहुल गांधींनी आपला मोर्चा ज्ञानेश कुमार यांच्याकडे वळवला. "आम्हाला तुमची स्थिती माहित आहे. तुम्ही रात्री झोपू शकत नाही. आम्ही तुम्हाला सोडणार नाही. तुम्ही मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून सुटू शकणार नाही," असा इशारा राहुल गांधींनी मुख्य निवडणूक आयुक्तांना दिला. 
ज्ञानेश कुमारांना दिले दोन पर्याय

राजीनामा द्या किंवा काय झालं याची माहिती द्या म्हणजेच अॅप्रूव्हर व्हा असं आवाहन करत राहुल गांधींनी ज्ञानेश्वर कुमारांसमोर दोन पर्याय ठेवले आहेत. "त्यांना जितकी जास्त सुरक्षा मिळेल, आम्ही त्यांच्या कंट्रोलरपर्यंत तितक्या सहज पोहोचू," असा विश्वासही राहुल गांधींनी व्यक्त केला.

दिल्लीला किल्ल्याचं स्वरुप
लोकांनी दिल्लीत येऊ दिलं जात नसल्याचा आरोप राहुल गांधींनी केला. दिल्लीला किल्ला बनवले आहे, असं म्हणताना राहुल गांधींनी, "दिल्लीत 20 ते 30 हजार पोलिस तैनात आहेत. लोकांना ट्रेन किंवा बसने दिल्लीत येऊ देत नाहीत. पोलिसांना तरुणांना मारहाण करण्याचे आदेश आहेत, तर आरएसएस सदस्यांना मोकळीक देण्यात आली आहे. काही पोलिस नाराज आहेत आणि विरोधकांच्या मागणीला समर्थन देत आहेत," असंही म्हटलं आहे.
आम्ही मागे हटणार नाही

विरोधकांची भूमिका मांडताना, "तुम्हाला जे करायचे ते करा, आम्ही मागे हटणार नाही," असं राहुल गांधी म्हणालेत. "संविधान पूर्णपणे लागू होईपर्यंत आणि निवडणूक व्यवस्था दुरुस्त होईपर्यंत देशाचे तरुण थांबणार नाहीत. ते सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करतील," असं राहुल गांधी म्हणालेत. सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी भेट नाकारल्यानंतर राहुल यांनी सर्वोच्च न्यायालयासंदर्भात हे सूचक विधान केलं.

हे लोक भित्रे
दोन निवडणूक आयुक्तांनी विचारलेल्या प्रश्नामुळे ज्ञानेश कुमार राजीनामा का देत नाहीत? ही प्रणाली (निवडणूक यंत्रणा) कोसळत आहे आणि हे लोक भित्रे आहेत, असंही राहुल गांधींनी म्हटलं आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.