🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

​"देशात आग लावणारे 'आतले' आणि 'बाहेरचे' शत्रू आता रडारवर; मोदींच्या कडक इशाऱ्याने खळबळ!"

​"देशात आग लावणारे 'आतले' आणि 'बाहेरचे' शत्रू आता रडारवर; मोदींच्या कडक इशाऱ्याने खळबळ!"


"शेकडो वर्षांची परकीय आक्रमणे आणि लुटीनंतर आजचा भारत आपली मूळ ओळख आणि सांस्कृतिक वारसा पुन्हा अभिमानाने प्रस्थापित करत आहे. अशा वेळी देशाचे नुकसान करणाऱ्या, समाजात फूट पाडणाऱ्या आणि संस्कृतीचा द्वेष करणाऱ्या आतल्या आणि बाहेरच्या शक्तींना ओळखून त्यांचा एकजुटीने पराभव करणे आवश्यक आहे", असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी केले.

नवी दिल्लीतील आय. पी. एक्स्टेंशन येथील उत्सव मैदानात आयोजित विजयादशमी महोत्सवात पंतप्रधान मोदी बोलत होते. देशातील जनतेला दसऱ्याच्या शुभेच्छा देताना ते म्हणाले, "प्रभू श्रीरामांचे आदर्श जपणारी परंपरा हा केवळ एक सण नसून, कोट्यवधी भारतीयांची ती आस्था आहे. हा दिवस केवळ असत्यावर सत्याच्या विजयापुरता मर्यादित नसून सत्य, धर्म आणि सुशासनाचे स्मरण करून देणारा पवित्र प्रसंग आहे."

'नागरिक देवो भव'

रामराज्याची संकल्पना स्पष्ट करताना पंतप्रधान म्हणाले, "रामराज्य म्हणजे सुशासनाचे असे प्रारूप, जिथे कोणावरही अन्याय अथवा भेदभाव होणार नाही, प्रत्येकाला समान न्याय व समान संधी मिळतील आणि सत्तेचा उद्देश राज्य करणे नसून केवळ लोककल्याण हाच असेल. हाच प्रभू श्रीरामांचा आदर्श आहे. त्यामुळेच आपण जनतेला जनार्दन मानून आणि 'नागरिक देवो भव' या मूलमंत्राचा अंगीकार करून पुढे गेले पाहिजे.




" गरीब आणि वंचित घटकांचे कल्याण हेच सरकारच्या धोरणांचे केंद्रस्थान असल्याचे नमूद करून ते पुढे म्हणाले, "आपल्याला आपल्या देशातील साधनसंपत्तीवर आणि सामर्थ्यावर पूर्ण विश्वास असायला हवा. संकल्पाचे रूपांतर शक्तीत करून स्वतःच्या परिश्रमातूनच समस्यांवर उपाय शोधले पाहिजेत." 

'भारताच्या शत्रूंचा एकत्र येऊन पराभव करू'

गेल्या १२ वर्षांत परदेशात गेलेल्या ६०० हून अधिक प्राचीन मूर्ती व सांस्कृतिक ठेवी भारतात परत आणल्याचे नमूद करत पंतप्रधान म्हणाले, "अनेक शतकांच्या परकीय आक्रमणांनंतर भारत आज आपले स्थान पुन्हा प्राप्त करत आहे. अशा वेळी राष्ट्रहितासाठी आपले विचार एक असायला हवेत. देशातील सर्व संस्था, राजकीय पक्ष आणि प्रत्येक घटकाने राष्ट्रीय हितासाठी एकत्र येणे गरजेचे आहे."

समाजाला इशारा देताना ते ठामपणे म्हणाले, "देशाचे नुकसान करणाऱ्या शक्ती, समाजात विष कालवून दुही माजवणारे घटक आणि आपल्या संस्कृतीचा द्वेष करणारी विकृत मानसिकता हेच देशाचे खरे शत्रू आहेत. या सर्वांचा आपल्याला एकत्रितपणे मुकाबला करावा लागेल."





➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.