🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगली जिल्ह्यात धक्कादायक घटना! आई-बाळाचा विहिरीत बुडून दुर्दैवी मृत्यू

सांगली जिल्ह्यात धक्कादायक घटना! आई-बाळाचा विहिरीत बुडून दुर्दैवी मृत्यू


उमदी पोलीस ठाणे हद्दीतील मायथळ सोलनकर वस्ती येथे विहिरीच्या पाण्यात बुडून आई आणि तिच्या १८ महिन्यांच्या बाळाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली.

या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत असून, नातेवाईकांचा आक्रोश मन हेलावून टाकणारा होता.

घटनेची माहिती मिळताच उमदी पोलिसांनी स्पेशल रेस्क्यू फोर्स आपत्कालीन पथक, आपत्ती व्यवस्थापन सांगली यांना माहिती दिली. माहिती मिळताच पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

सुमारे ४० × ६० फूट आकाराच्या विहिरीत रेस्क्यू मोहीम राबवत स्पेशल रेस्क्यू फोर्सच्या पथकाने अथक प्रयत्न करून आई व बाळाचे दोन्ही मृतदेह काही मिनिटांत पाण्यातून बाहेर काढले.

मृत महिलेचे नाव निता गजानन सोलनकर (वय २९ वर्षे) असून, तिच्या १८ महिन्यांच्या बाळाचे नाव अवनी गजानन सोलनकर असे आहे.

रेस्क्यू कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर दोन्ही मृतदेह पुढील वैद्यकीय तपासणी व कायदेशीर कार्यवाहीसाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले. या दुर्दैवी घटनेने सोलनकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, नातेवाईकांनी केलेला आक्रोश उपस्थितांचे मन हेलावून गेला.

या रेस्क्यू कार्यवाहीमध्ये स्पेशल रेस्क्यू फोर्स आपत्कालीन पथक, आपत्ती व्यवस्थापन सांगलीचे सिनियर कमांडर कैलास वडर, कमांडर महेश गव्हाणे, सागर जाधव, आमिर नदाफ, इर्शाद कवठेकर, आसिफ मकानदार, लहू घोरपडे यांच्यासह पथकातील कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. घटनेचा पुढील तपास उमदी पोलीस करीत आहेत.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.