सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी प्रयत्न केले. मात्र, जिल्हा बँकेतील समझोत्याचा आगामी पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीवर कोणताही परिणाम होणार नाही, असे आमदार डॉ. विश्वजीत कदम यांनी स्पष्ट केले. जिल्हा बँकेच्या संचालकपदी बिनविरोध निवड झाल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीप्रमाणे सांगली जिल्हा बँकेची निवडणूकही महाविकास आघाडी आणि समविचारी पक्षांच्या माध्यमातून लढवण्याची तयारी होती. मात्र, जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती पाहता राजकीय संघर्ष आणि टीका-टिप्पणी टाळावी, अशी मतदारांची भूमिका होती. त्यामुळे निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी प्रयत्न केल्याचे कदम यांनी सांगितले. सांगली जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाबाबत लवकरच सर्वानुमते निर्णय घेतला जाईल, असेही कदम यांनी स्पष्ट केले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.