ग्रेटर नोएडा येथे एक धक्कादायक घटना घडल्याचे समोर आले आहे. २३ व्या मजल्यावरून पडून वडील आणि ११ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. फ्लॅटच्या बाल्कनीतून फुले तोडत असताना तोल गेल्यामुळे ही हृदयद्रावक घटना घडली आहे.
या घटनेमुळे परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवार, ३० ऑक्टोबर रोजी ग्रेटर नोएडा येथील बिसरख पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महागुन मायवूड्स सोसायटीमध्ये ही खळबळजनक घटना घडली आहे.
२३व्या मजल्यावरील खोलीच्या एका गॅलरीमधून पडून वडील रणदीप पात्रा (वय ४०) आणि त्यांचा ११ वर्षीय मुलगा आरव याचा मृत्यू झाला आहे. वडील आपल्या मुलाला बालकनीतून फुले तोडायला सांगत होते. यावेळी फुलं तोडत असताना मुलाचा अचानक तोल गेला, मुलगा खाली पडत असल्याचे दिसताच त्याला वाचवण्यासाठी गेले असता त्याच्या वडिलांचाही तोल गेल्याने ते खाली कोसळले.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी तातडीने दाखल झाले. या घटनेप्रकरणी बिसरख पोलीस ठाण्यात पंचनामा दाखल करण्यात आला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. तसेच या घटनेचा पुढील तपास सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.
कुटुंब आनंदाने मंदिरात जाण्याच्या तयारीत होते, पण...
ग्रेटर नोएडा येथे घडलेल्या या घटनेप्रकरणी मृतांच्या कुटुंबावर दुःखाचे डोंगर कोसळले आहे. खाटू श्याम येथील भूखंडाच्या नोंदणीसाठी त्यांना सकाळी लवकर निघायचे होते. त्यामुळे, तिचे पती आणि मुलगा पूजेसाठी बाल्कनीतून फुले तोडत होते.
त्याचवेळी, मुलगा जिन्यावरून घसरून खाली पडला. त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात, वडील आणि मुलगा दोघेही बाल्कनीतून खाली पडले आणि त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला, अशी माहिती रणदीप पात्रा यांनी दिली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.