जिल्हयातील १५९ नेत्ररुग्ण बालकांची मोफत तपासणी, ६६ बालकांवर होणार मोफत शस्त्रक्रिया जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजयकुमार वाघ यांचे सर्वतोपरी प्रयत्न राज्यात राबविल्या जात असलेल्या "सेवा संकल्प अभियान" अंतर्गत सांगली जिल्हयात राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत मंगळवार दि. १३ रोजी सिव्हिल हॉस्पिटल सांगली येथे बालकांकरिता शाळा व अंगणवाडीतून आरोग्य तपासणीतून संदर्भित करणेत आलेल्या नेत्ररुग्ण बालकांकरिता जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयामार्फत मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन करणेत आले होते. शिबीरांकरिता डॉ. दिलिप व डॉ. माधवी पटवर्धन, आभाळमाया फौंडेशनचे नारायण उंटवाले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजयकुमार वाघ, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम, रुग्ण पालक व बालकांमार्फत शिबीराचे उद्घाटन करणेत आले. महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजना व राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमांतर्गत करारबध्द डॉ. पटवर्धन यांचे नंदादिप नेत्रालय यांच्या पथकांमार्फत अद्ययावत नेत्र तपासणी साहित्य साधनांद्वारे बालकांचीसखोल तपासणी करणेत आली.
जिल्हयातील जत पासून शिराळापर्यंत सर्व तसेच महानगरपालिका कार्यक्षेत्रातील राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत समाविष्ट शाळा व अंगणवाडी तपासणी कार्यक्रमांतर्गत संदर्भित १५९ बालकांची नेत्रतपासणी करणेत आली. तपासणीअंती ६६ बालकांना विविध प्रकारच्या नेत्र शस्त्रक्रिया आवश्यक असल्याचे निदर्शनास आले असून उपलब्ध योजना व इतर सर्व माध्यमांतून सर्व शस्त्रक्रिया या मोफत केल्या जाणार आहेत. पात्र ६६ बालकांपैकी ४३ शस्त्रक्रिया या योजनेतून केल्या जाणार आहेत. परंतू २३ शस्त्रक्रियांकरिता स्वतंत्र निधी उभा करावा लागणार होता मात्र उद्घाटन प्रसंगी उपस्थित डॉ. दिलीप पटवर्धन व डॉ. माधवी पटवर्धन तसेच आभाळमाया फौंडेशनचे नारायण उंटवाले यांना सदरबाबत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम व जिल्हा समन्वयक डॉ. प्रमोद चौधरी यांनी आवाहन केले नंतर सहकार्याची तयारी दर्शविली आहे.
शिबीराकरिता राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतील अधिकारी व कर्मचारी हे गाव, तळ, वाडी, बस्ती येथून शोध घेवून लाभार्थी संदर्भित केले. शिबीराचे नियोजन जिल्हा कार्यक्रम समन्वयक डॉ. प्रमोद चौधरी, कार्यक्रम सहाय्यक अनिता हसबनीस, रोहित चौगुले यांनी पाहिले. कार्यक्रमांकरिता डीईआयसी व जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाकडील सर्व अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.