🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

"टायगरला आधीच फोन करून..." गोळीबारामागचं खरं कारण समोर; गँगस्टर बिश्नोईची कबुली!

"टायगरला आधीच फोन करून..." गोळीबारामागचं खरं कारण समोर; गँगस्टर बिश्नोईची कबुली!


बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ याच्यावर मुंबईतील जुहू परिसरात गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे मनोरंजन विश्वात खळबळ उडाली आहे. जुहू येथील पुष्पा पार्क परिसरात तीन अज्ञात दुचाकीस्वारांनी गोळीबार केल्याची माहिती आहे.

या घटनेत टायगरचा चालक जखमी झाल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान, टायगर सुरक्षित असून त्याला कोणतीही दुखापत झालेली नसल्याची प्राथमिक माहिती आहे. या हल्ल्यामागचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मिळालेल्या माहितीनुसार, हल्लेखोरांनी सुमारे चार राउंड गोळीबार केला. 




सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये गोळीबाराचे आवाज ऐकू येत असल्याचा दावा केला जात आहे. या घटनेनंतर परिसरात गोंधळ उडाला. गोळीबाराची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. दुचाकीवरून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांचा शोध घेतला जात असून, त्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत आहे.

दरम्यान, टायगर श्रॉफला यापूर्वीही जीवे मारण्याची धमकी मिळाल्याचं सांगितलं जात आहे. या गोळीबाराची जबाबदारी बिश्नोई गँगने घेतल्याचा दावा करणारी एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. अनिल पंडित नावाच्या फेसबुक खात्यावरून ही पोस्ट शेअर करण्यात आल्याची माहिती आहे. 

या पोस्टमध्ये टायगरला फोन करून समजावलं होतं, मात्र त्याने ऐकलं नाही, त्यामुळे हा हल्ला केल्याचा दावा करण्यात आला आहे. तसंच, सलमान खानसोबत काम करणाऱ्यांना त्याचे परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही या पोस्टमध्ये देण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, ही पोस्ट खरोखरच बिश्नोई गँगशी संबंधित आहे का, याबाबत अद्याप अधिकृत पुष्टी झालेली नाही.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.