🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

विरोधकांचा सुप्रीम कोर्टावर महामोर्चा! राहुल-अखिलेशसह ११ नेत्यांची ज्ञानेशकुमारांविरोधात ऐतिहासिक रिट याचिका

विरोधकांचा सुप्रीम कोर्टावर महामोर्चा! राहुल-अखिलेशसह ११ नेत्यांची ज्ञानेशकुमारांविरोधात ऐतिहासिक रिट याचिका


देशामध्ये ज्ञानेश कुमार यांच्या विरोधामध्ये रणकंदन माजला असतानाच आज इंडिया आघाडीकडून अभूतपूर्व मोर्चा सुप्रीम कोर्टावर काढण्यात आला. इंडिया आघाडीने सुप्रीम कोर्टावरती मोर्चा काढतानाच सरन्यायाधीश सूर्यकांत यांना भेटीची वेळ मागितली होती, मात्र सूर्यकांत यांनी भेटीची वेळ नाकारली.

मोर्चाचे नेतृत्व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केलं. या मोर्चामध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून दिल्ली पोलिसांना घामटा फोडणारी नेहा बोरा सुद्धा आंदोलनामध्ये दिसून आली. खासदार प्रियंका गांधी, समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव, राष्ट्रीय जनता दलाचे तेजस्वी यादव, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह 11 पक्षांकडून सुप्रीम कोर्टामध्ये ज्ञानेश कुमार आणि एसआर विरोधामध्ये रिट याचिका दाखल करण्यात आली. बहुधा देशाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच असा न भूतो न भविष्यती असा मोर्चा सुप्रीम कोर्टावर धडकला.

बाराखंबापासून सर्वोच्च न्यायालयापर्यंत मोर्चा
या मोर्चामध्ये जवळपास 1 किलोमीटरच्या अंतरामध्ये विरोध पक्षानेत्यांनी थोडं अंतर बसमधून, थोडं अंतर पायी तर थोडं अंतर वाहनांमधून पार केलं. काँग्रेसकडून देशभरातील नेत्यांना राजधानीमध्ये बोलावण्यात आलं होतं. त्यामुळे काँग्रेस शासित राज्याचे मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष, आमदार, खासदार या मोर्चामध्ये सहभागी झाले होते. विरोधी पक्षांचे नेते सुद्धा सहभागी झाले होते. त्यामुळे अशा अभूतपूर्व एकजुट मोर्चामध्ये दिसून आली. विरोधी नेत्यांनी बाराखंबापासून सर्वोच्च न्यायालयापर्यंत मोर्चा काढला. बाराखंबा येथून सर्वोच्च न्यायालयाकडे मोर्चा काढणाऱ्या राहुल गांधी यांना भगवान दास रोडवर थांबवण्यात आले. दिल्ली पोलिसांनी तेथे बॅरिकेड्स लावून पुढील हालचाल रोखली. भगवान दास रोडवर निमलष्करी दल आणि उत्तर प्रदेश पोलिसांसह मोठ्या संख्येने पोलीस दल तैनात करण्यात आले होते. 

दरम्यान, राहुल गांधी आणि विरोधी नेत्यांनी दाखल केलेल्या याचिकेतील तांत्रिक त्रुटी आजच दूर करण्याचे निर्देश सरन्यायाधीशांनी रजिस्ट्रीला दिले आहेत, जेणेकरून ही याचिका उद्या सुनावणीसाठी सूचीबद्ध केली जाऊ शकेल. सूत्रांच्या हवाल्याने वृत्तसंस्था आयएएनएसने दिलेल्या वृत्तानुसार, सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठ मंगळवारी या याचिकेवर सुनावणी घेण्याची शक्यता आहे. मोर्चापूर्वी राहुल गांधी यांनी 40 मिनिटांची पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी म्हटले की, विरोधी पक्षांचा मोर्चा हा शिव तांडवासारखा असून त्यात कोणीही सहभागी होऊ शकते. रविवारी, विरोधी खासदारांनी भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांना पत्र लिहून निवेदन सादर करण्यासाठी वेळ मागितला. मात्र, सरन्यायाधीशांनी त्यांना भेटण्यास नकार दिला आणि याचिका दाखल करण्यास सांगितले.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.