🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पोलीस पतीकडून चारित्र्यावर संशय, फ्लॅटवरून दबाव टाकला; पत्नीला संताप अनावर होताच नाशिकमध्ये धक्कादायक घटना!

पोलीस पतीकडून चारित्र्यावर संशय, फ्लॅटवरून दबाव टाकला; पत्नीला संताप अनावर होताच नाशिकमध्ये धक्कादायक घटना!


नाशिक: नाशिकमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत पोलिस पतीच्या छळाला कंटाळून एका महिलेने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याचं उघड झालं आहे. दीपाली अनिल पवार (वय,३७) असे आत्महत्या केलेल्या पोलीस पत्नीचे नाव असून, संशयित अनिल पवार यांना अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून मयत दीपाली अनिल पवार (वय.३७, रा.फ्लॅट नं. ५०२ निकेतन क्लासिक अपार्टमेंट, पाम टाऊन जवळ, सिक्सिकमा हॉस्पिटल समोर, महात्मा नगर, नाशिक) या पती अनिल पवार यांच्या छळाला सामोरे जात होत्या. गेली अनेक दिवस त्या मानसिक छळाला कंटाळल्या होत्या. दीपाली पवार यांचा विवाह अनिल पवार यांच्याशी सन २०१४ मध्ये झाला होता. दीपाली या जातेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात परिचारिका म्हणून काम करत होत्या, तर त्यांचे पती अनिल पवार हे नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयात वरिष्ठ लिपीक म्हणून कार्यरत आहे.

प्राथमिक माहितीनुसार, दीपाली यांनी अहिल्यानगर येथे एक फ्लॅट घेतलेला होता. हा फ्लॅट सासरकडच्या व्यक्तीच्या नावे करावा यासाठी दबाव टाकला जात होता. एवढेच नव्हे तर दीपाली यांच्या चारित्र्यावर देखील संशय करून संशयित दिलीप पवार यांच्याकडून त्यांना मारहाण देखील केली जात असल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आलेला आहे. याच जाचाला कंटाळून दीपाली यांनी अखेर ५ ऑक्टोबर रोजी अल्फोस पेस्टिसाइड नावाचे विषारी औषध प्राशन केले. 

औषध प्यायल्याने त्यांना चक्कर आणि उलट्यांचा त्रास होऊ लागला. त्यानंतर त्यांनी स्वत: कार चालवत गंगापूर रोड येथील एका खाजगी रुग्णालय गाठले. तिथे डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना नाशिकच्या सिव्हिल रुग्णालय येथे हलविण्यात आले. दीपाली यांचा भाऊ भूषण गायकवाड यांनी त्यांना पुढील उपचारासाठी पुन्हा एका खाजगी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचार सुरू असताना दीपाली यांची प्राणज्योत मालवली. मयत दीपाली यांच्या घरच्यांकडून देण्यात आलेल्या तक्रारीनुसार संशयित अनिल पवार यांना अटक करण्यात आली. न्यायालयात त्याला हजर केले असता नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने दिलीप पवार याला ९ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.