🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

डॉक्टरांवर चप्पल उचलली, जीवे मारण्याची धमकी! शासकीय कामात अडथळा आणणाऱ्या नगरसेवक अभिजित भोसलेला ६ महिने साधी कैद

डॉक्टरांवर चप्पल उचलली, जीवे मारण्याची धमकी! शासकीय कामात अडथळा आणणाऱ्या नगरसेवक अभिजित भोसलेला ६ महिने साधी कैद


​सांगली:- येथील  शासकीय रुग्णालयात कर्तव्य बजावणाऱ्या डॉक्टरवर धावून जात चप्पल उगारल्याप्रकरणी आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी अभिजित दत्तात्रय  भोसले (वय ३१, रा. हनुमाननगर, सांगली) या आरोपीला सांगलीच्या अतिरिक्त सत्र न्यायालयाच्या न्यायाधीश श्रीमती एस. एन. शेट्टे यांनी ६ महिने साधी कैद आणि २,००० रुपये दंड अशी कठोर शिक्षा सुनावली आहे. दंड न भरल्यास आणखी १५ दिवस साधी कैदेची शिक्षा भोगावी लागणार आहे.





​काय होती घटना?

१६ ऑगस्ट २०१९ रोजी रात्री साडेआठ वाजता सांगलीच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हा प्रकार घडला होता. फिर्यादी डॉक्टर गहदे हे आपल्या कर्तव्यावर असताना आरोपी अभिजित भोसले तिथे आला. 'पेशंट शिफ्ट का केला नाही?' या शुल्लक कारणावरून त्याने डॉक्टरशी वाद घातला. इतकेच नव्हे तर, अंगावर धावत जात पायातील चप्पल काढून मारायला उठला, अर्वाच्य शिवीगाळ केली आणि 'तुला जिवंत ठेवणार नाही,' अशी थेट धमकी दिली होती.




​महत्त्वाच्या साक्ष ठरल्या निर्णायक:

याप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. खटल्याचे कामकाज चालत असताना अतिरिक्त सरकारी अभियोक्ता यु. बी. करवदे यांनी एकूण ५ साक्षीदार तपासले. यामध्ये फिर्यादी डॉक्टर गडदे यांच्यासह प्रत्यक्षदर्शी डॉक्टर अतुल पवार आणि परिचारिका जयश्री ठोंबरे यांची साक्ष अत्यंत महत्त्वपूर्ण ठरली.  




आरोपीविरोधात सबळ पुरावे मिळाल्याने न्यायालयाने त्याला दोषी ठरवत ही शिक्षा सुनावली. या संपूर्ण तपासात विश्रामबाग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक व महिला पोलीस नाईक श्रीमती कविता निर्मळे यांनी मोलाचे सहकार्य केले.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.