🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

ब्रिटन, अमेरिकेनंतर आता जपानही 'अलर्ट मोड'वर! ३ दिवसांचा अन्नसाठा जमा करण्याचे आदेश; नेमकं घडतंय तरी काय?

ब्रिटन, अमेरिकेनंतर आता जपानही 'अलर्ट मोड'वर! ३ दिवसांचा अन्नसाठा जमा करण्याचे आदेश; नेमकं घडतंय तरी काय?


लंडन :- जगभरातील वाढता भू-राजकीय तणाव, सायबर हल्ले आणि नैसर्गिक आपत्तींचा धोका लक्षात घेऊन ब्रिटन, अमेरिका आणि जपानमध्ये आपत्कालीन तयारीवर भर दिला जात आहे. ब्रिटन सरकारने नागरिकांना किमान ७२ तास पुरेल इतके अन्न, पाणी आणि जीवनावश्यक वस्तू घरात ठेवण्याचे आवाहन केले आहे. अमेरिकेत लष्करी तळांना बाह्य पुरवठा खंडित झाला तरी कार्यरत ठेवण्याची तयारी सुरू आहे. जपानमध्येही आपत्तीच्या काळात आवश्यक वस्तूंचा साठा ठेवण्यावर भर दिला जात आहे.




ब्रिटनमध्ये 'बी रेडी' मोहीम

ब्रिटन सरकारने 'बी रेडी' या मोहिमेद्वारे नागरिकांना संभाव्य संकटांसाठी तयार राहण्याचे आवाहन केले आहे. पूर, जंगलातील वणवे, वीजपुरवठा खंडित होणे, इंटरनेट सेवा बंद पडणे आणि सायबर हल्ले यांमुळे दैनंदिन जीवन विस्कळीत होऊ शकते. अशा परिस्थितीत मदत पोहोचेपर्यंत नागरिकांना स्वतःची व्यवस्था करता यावी, हा या मोहिमेचा उद्देश आहे. 



सरकारने प्रत्येक व्यक्तीसाठी दररोज सुमारे तीन लिटर पिण्याचे पाणी, तीन दिवस पुरेल इतके टिकाऊ अन्न, आवश्यक औषधे, प्रथमोपचार पेटी, टॉर्च, अतिरिक्त बॅटरी, रेडिओ, पॉवर बँक, ब्लँकेट आणि रोख रक्कम ठेवण्याचा सल्ला दिला आहे. इलेक्ट्रॉनिक पेमेंट किंवा एटीएम सेवा बंद पडल्यास रोख रक्कम उपयोगी ठरू शकते.

अमेरिकेची ९० दिवसांची तयारी

अमेरिकेतील लष्करी तळांना बाह्य पुरवठ्याशिवाय दीर्घकाळ कार्यरत ठेवण्याची तयारी केली जात आहे. वीज, पाणी, इंधन आणि संपर्क व्यवस्था विस्कळीत झाल्यास लष्करी कामकाज सुरू राहावे, यासाठी ही योजना महत्त्वाची मानली जात आहे.



जपानमध्येही आपत्कालीन साठ्यावर भर

जपानमध्ये भूकंप आणि सुनामीसारख्या नैसर्गिक आपत्तींचा धोका लक्षात घेऊन नागरिकांनी किमान तीन दिवस, शक्य असल्यास आठवडाभर पुरेल इतके अन्न-पाणी आणि आवश्यक वस्तू साठवून ठेवाव्यात, यावर भर दिला जात आहे.

असे असले तरी ही सर्व तयारी मोठ्या युद्धाची शक्यता निर्माण झाली आहे म्हणून सुरू करण्यात आलेली नाही. आपत्ती, सायबर हल्ले किंवा पुरवठा साखळी विस्कळीत झाल्यास नागरिकांचे दैनंदिन जीवन कमीत कमी प्रभावित व्हावे, यासाठी ही खबरदारी घेतली जात आहे.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.