🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

वेदांत बंडगर हत्या प्रकरण: आमदार गोपीचंद पडळकरांच्या सहभागाचा गंभीर आरोप; मुख्य आरोपी अवघ्या ३ महिन्यांत बाहेर आल्याने न्यायासाठी आमरण उपोषण!

वेदांत बंडगर हत्या प्रकरण: आमदार गोपीचंद पडळकरांच्या सहभागाचा गंभीर आरोप; मुख्य आरोपी अवघ्या ३ महिन्यांत बाहेर आल्याने न्यायासाठी आमरण उपोषण!


सांगली :- चर्चित ठरलेल्या वेदांत बंडगर हत्या प्रकरणात आता राजकीय वळण आले असून, या प्रकरणात आमदार गोपीचंद पडळकर यांचा थेट सहभाग असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. हत्येसारख्या अत्यंत गंभीर गुन्ह्यात कारागृहात गेलेला मुख्य आरोपी अवघ्या तीन महिन्यांच्या आत बाहेर आल्यामुळे संपूर्ण परिसरातून संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणातील मुख्य सूत्रधारांना पाठीशी घातले जात असल्याचा आरोप करत, पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी आता आमरण उपोषणाचे हत्यार उपसण्यात आले आहे.

​तब्बल तीन महिने उलटूनही न्याय मिळत नसल्याने आणि खुनातील आरोपी खुलेआम बाहेर फिरत असल्यामुळे नागरिकांमध्ये व हमाल पंचायतीमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना अभय देणाऱ्या राजकीय नेत्यांचा बुरखा फाडण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

​प्रशासनाला अंतिम इशारा
आरोपीला मिळालेला जामीन तत्काळ रद्द करण्यात यावा, या मुख्य मागणीसाठी हा लढा तीव्र करण्यात आला आहे. जर प्रशासनाने यावर तातडीने कायदेशीर पावले उचलली नाहीत, तर संपूर्ण बाजारपेठ बंद ठेवून तीव्र आंदोलन छेडण्याचा सज्जड इशारा हमाल पंचायत समितीच्या वतीने प्रशासनाला देण्यात आला आहे. आता या प्रकरणी पोलीस आणि प्रशासन नेमकी काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

​"वेदांत बंडगर प्रकरणातील मुख्य आरोपीला अवघ्या तीन महिन्यांत जामीन मिळणे हे न्यायव्यवस्थेची थट्टा आहे. यामागे राजकीय दबाव असून आमदार गोपीचंद पडळकरांचा थेट हात असल्याचा आमचा आरोप आहे. आरोपीचा जामीन त्वरित रद्द करा, अन्यथा संपूर्ण बाजारपेठ बंद ठेवून तीव्र आंदोलन केले जाईल."





➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.