🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

​"देवाच्या घरी राक्षसाचा सावळा गोंधळ! चर्चमध्ये प्रार्थनेला येणाऱ्या ५० निष्पाप मुलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या नराधम पाद्री सिप्रियन पिंटोच्या मुसक्या आवळल्या!"

​"देवाच्या घरी राक्षसाचा सावळा गोंधळ! चर्चमध्ये प्रार्थनेला येणाऱ्या ५० निष्पाप मुलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या नराधम पाद्री सिप्रियन पिंटोच्या मुसक्या आवळल्या!"


मंगळुरू येथील व्हॅलेन्सिया चर्चमध्ये प्रार्थनेसाठी येणाऱ्या ५० हून अधिक निष्पाप मुलांचे लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी मंगळुरूच्या पांडेश्वर पोलीस ठाण्याच्या पथकाने मुख्य संशयित पाद्री  सिप्रियन पिंटो याला सकलेशपूर येथून बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तीव्र संताप व्यक्त होत असून नागरिकांमधून कडक कारवाईची मागणी केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चर्चमध्ये नियमित प्रार्थनेसाठी येणाऱ्या अल्पवयीन मुलांना लक्ष्य करून पाद्री (Pastor) सिप्रियन पिंटो त्यांचे लैंगिक शोषण करत होता. दीर्घकाळापासून हा विकृत प्रकार सुरू असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. नुकतेच दोन मुलांनी हिंमत दाखवून चर्चमध्ये घडलेला सर्व प्रकार आपल्या पालकांच्या कानावर घातला. हा धक्कादायक प्रकार ऐकून संतप्त झालेल्या पालकांनी तात्काळ मंगळुरू दक्षिण पोलीस ठाणे गाठून पाद्रीविरुद्ध (Pastor) रीतसर तक्रार दाखल केली.

पालकांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण (पॉक्सो – POCSO) कायद्यासह भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांन्वये गुन्हा नोंदवला. गुन्हा दाखल झाल्याची कुणकुण लागताच आरोपी सिप्रियन पिंटो फरार झाला होता. पांडेश्वर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत त्याचा माग काढला आणि अखेर सकलेशपूर येथे सापळा रचून त्याला ताब्यात घेतले.  





धार्मिक स्थळी घडलेल्या या घृणास्पद कृत्यामुळे पालकांमध्ये भीतीचे व संतापाचे वातावरण पसरले आहे. प्राथमिक तपासात पीडित मुलांची संख्या ५० हून अधिक असल्याचे समोर येत असून, या प्रकरणात आणखी मुलांचे शोषण झाले आहे का, याचा सखोल तपास पोलीस करत आहेत. आरोपीला न्यायालयात हजर करण्याची प्रक्रिया सुरू आहे.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.