प्रसिद्ध पंजाबी गायक दलेर मेहंदी याच्यावर एका कार्यक्रमात मद्य पिऊन गायन केल्याचा आरोप केला जात आहे. उत्तराखंडाच्या टिहरी जिल्ह्यातील नरेंद्रनगरात आयोजित प्रसिद्ध कुंजापुरी जत्रेत त्यांना परफॉर्म करण्यासाठी बोलावले होते. परंतू, कॅबिनेट मंत्री आणि नरेंद्रनगरचे आमदार सुबोध उनियाल यांनी नशेत बेधुंद अवस्थेत गात असलेल्या दलेर मेहंदी याच्यावर जोरदार टीका केल्याने हंगामा झाला आहे.
वास्तविक, कार्यक्रमात गायक दलेर मेहंदी नशेत धुंद असलेल्या अवस्थेत गाताना पाहून मंत्री सुबोध उनियाल थेट मंचावर गेले आणि त्यांनी दलेर मेहंदी याच्यावर जोरदार टीका करीत त्याचा जाहीर पाणउतारा केला. त्यांनी हे देखील म्हटले की नशेच्या स्थितीत अशा प्रकारे गाणे योग्य नाही. त्या दरम्यान व्हिडीओ देखील समोर आला होता. ज्यात सुबोध उनियाल व्यासपीठावर दलेर मेहंदी यांच्या शेजारी उभे असलेले दिसत आहेत.
'तुम्ही तर मुर्ख बनवत आहात '
सुबोध उनियाल यांनी गायक दलेर मेहंदी यांच्यावर टीका करताना, एवढे पैसे देऊन आम्ही तुम्हाला बोलावले की आमच्या लोकांचे मनोरंजन व्हावे. परंतू तुम्ही तर लोकांना मुर्ख बनवत आहात. त्यांनी नवरात्रीच्या शुभ मुहुर्तावर आयोजित धार्मिक कार्यक्रमात मर्यादा पाळायला हवी असे सांगत जाहीर नाराजी व्यक्त केली. त्यांनी आरोप केला की धार्मिक आयोजनात दारु पिऊन परफॉर्मन्स करणे अजिबात उचित नाही.
सुबोध उनियाल यांनी व्यासपीठावर दलेर मेहंदी यांच्या टीका करताना म्हटले की येथे जनता तुम्हाला लाईव्ह ऐकण्यासाठी आली आहे. येथे जनता पाठीमागून वाजणाऱ्या डबिंग वा कोणत्या रेकॉर्डेड आवाजावर तुम्हाला एक्टींग करताना पाहायला आलेली नाही. यावर कार्यक्रमानंतर दलेर मेहंदी यांनी म्हटले की माझी तब्येत थोडी बिघडली होती. मी लाईव्ह गाण्याच्या स्थितीत नव्हतो. कार्यक्रमामध्ये कोणताही व्यत्यय नको म्हणून आपण रेकॉर्डेड आवाजाची मदत घेतली.
'देवभूमीच्या जनतेचा अपमान'
सुबोध उनियाल यांनी म्हटले की आहे की गायक दलेह मेहंदी यांनी या ऐतिहासिक जत्रेसह देवभूमीच्या जनतेच्या भावनांचा अपमान केला आहे. मात्र, स्वत:ची बाजू मांडताना गायक दलेर मेहंदी यांनी म्हटलंय की आपण येथील लोकांचा खूप आदर करतो आहोत. आपली तब्येत बरी नसल्याने रेकॉर्डेड गाणी लावण्यात आल्याचे गायक दलेर मेहंदी यांनी म्हटले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.