🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

​"हे सारं संपवा..." दुर्गा मातेच्या चरणी ढसाढसा रडले खासदार कल्याण बॅनर्जी; पाहा व्हायरल व्हिडिओ

​"हे सारं संपवा..." दुर्गा मातेच्या चरणी ढसाढसा रडले खासदार कल्याण बॅनर्जी; पाहा व्हायरल व्हिडिओ


तृणमूल काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि पश्चिम बंगालमधील श्रीरामपूर मतदारसंघाचे खासदार कल्याण बॅनर्जी यांचा एक अत्यंत भावूक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. संसदेत आणि राजकीय व्यासपीठांवरही आपल्या आक्रमक भाषा शैलीसाठी ओळखले जाणारे कल्याण बॅनर्जी महाष्टमीच्या 'संधि पूजे'दरम्यान दुर्गा देवीच्या मूर्तीसमोर ढसाढसा रडताना दिसले.

संस्कृत श्लोक म्हणताना अश्रू अनावर - बॅनर्जी श्रीरामपूर येथील त्यांच्या 'गंगा दर्शन' येथे आयोजित दुर्गापूजेदरम्यान भावूक झाले. महाष्टमी आणि महानवमीच्या संधीकाळात होणाऱ्या पवित्र संधी पूजेदरम्यान ते पूर्णपणे देवीच्या भक्तीत लीन झाले होते. देवीच्या मूर्तीसमोर हात जोडून संस्कृत श्लोकांचे उच्चारण करत असतानाच ते अत्यंत भावनिक झाले. त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्यांनी अत्यंत भावूक होऊन प्रार्थना केली, "आई, मला सद्बुद्धी दे, शक्ती दे, ज्ञान दे आणि भक्ती दे," असं मागणी त्यांनी यावेळी मागितलं. याच बरोबर त्यांनी "भवतारिणी आई, जय तारा!" असा जयघोषही केला.





कल्याण बॅनर्जी दरवर्षी दुर्गापूजा आणि त्यांच्या बांकुरा येथील मूळ गावी होणाऱ्या कालीपूजेदरम्यान अशाच प्रकारे भावूक होताना दिसतात. यापूर्वी ते श्रीरामपूर रेल्वे स्टेशनजवळील आरएमएस मैदानातील पूजेचे मुख्य संरक्षक होते. मात्र, स्थानिक राजकीय समीकरणे बदलल्यानंतर आरएमएस मैदानावरील पूजेचे नियंत्रण आता भाजपकडे गेले असल्याने, यावेळी त्यांनी आपल्या राहत्या घरी आयोजित पूजेतही सहभाग नोंदवला.




➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.