आजकाल कॅन्सरचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. त्यात प्रोस्टेट कॅन्सर हा पुरुषांमध्ये वेगाने वाढणारा कॅन्सर मानला जातो. मात्र धक्कादायक बाब म्हणजे ८४% पुरुषांना त्यांची प्रोस्टेट कॅन्सरची तपासणी झाली आहे की नाही, हेच माहिती नाही, असा खुलासा नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणातून झाला आहे. या आजारावर योग्य वेळी उपचार होण्यासाठी सर्वप्रथम तपासणी आणि जनजागृती होणे गरजेचे असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
अलीकडेच ४५ वर्षे आणि त्यापेक्षा जास्त वयाच्या १,०३६ पुरुषांवर राष्ट्रीय स्तरावर करण्यात आलेल्या सर्वेक्षणात असे आढळले की, १० पैकी ६ पुरुषांना त्यांची प्रोस्टेट कॅन्सरची तपासणी कधी झाली होती की नाही, हेच माहिती नाही. तर ८४% पुरुषांची तपासणी झालेली नाही, किंवा त्यांना स्वतःच्या तपासणीबाबत खात्री नाही, किंवा तपासणीची गरजच वाटत नाही. त्यामुळे हा कॅन्सर अधिक धोकादायक ठरत असल्याचे समोर आले आहे.
HEAL Foundation आणि Cygen Global Insights & Consulting यांनी संयुक्तपणे केलेल्या या सर्वेक्षणात दिल्ली-एनसीआर, तमिळनाडू, कर्नाटक, तेलंगणा आणि महाराष्ट्रातील ४५ वर्षांवरील पुरुषांचा समावेश करण्यात आला होता. या सर्वेक्षणात ६८.९% पुरुषांना प्रोस्टेट कॅन्सरचा एकही धोका सांगता आला नाही. तर फक्त १३.२% पुरुषांनी कौटुंबिक इतिहास हा या आजाराचा धोका असल्याचे ओळखले. याशिवाय जवळपास ७५% पुरुषांचे मत होते की प्रोस्टेट कॅन्सरची तपासणी ५० वर्षांनंतरच सुरू करावी.
याबाबत मॅक्स हेल्थकेअर, दिल्ली येथील मेडिकल ऑन्कोलॉजी विभागाचे उपाध्यक्ष डॉ. देवव्रत आर्य म्हणाले, "या निष्कर्षांमुळे प्रोस्टेट कॅन्सरबाबत जनजागृतीची मोठी कमतरता असल्याचे दिसून येते. जेव्हा १० पैकी जवळपास ७ पुरुषांना या आजाराचा एकही धोका माहिती नसतो आणि १० पैकी ६ पुरुषांना स्वतःची तपासणी झाली की नाही हेच माहिती नसते, तेव्हा ४५ वर्षांवरील पुरुषांच्या नियमित आरोग्य तपासणीत प्रोस्टेटच्या आरोग्याचा विषय महत्त्वाचा ठरतो. धोके, तपासणी आणि डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा, याबाबत जागरूकता वाढवणे ही योग्य आरोग्य निर्णय घेण्याची पहिली पायरी आहे."
सर्वेक्षणात समोर आलेल्या महत्त्वाच्या बाबी
तपासणीतील ही तफावत चिंताजनक आहे. जवळपास दोन-तृतीयांश पुरुषांनी दरवर्षी नियमित आरोग्य तपासणी करत असल्याचे सांगितले.
६०.८% पुरुषांना त्यांच्या प्रोस्टेट कॅन्सर तपासणीची स्थिती माहिती नव्हती, तर फक्त सहा पैकी एका पुरुषानेच तपासणी झाल्याचे सांगितले.PSA (प्रोस्टेट स्पेसिफिक अँटिजेन) रक्त तपासणीबाबतही जागरूकता कमी होती. फक्त ३१% पुरुषांनी या तपासणीबद्दल ऐकले होते, तर १४% पुरुषांनी स्वतःहून ही तपासणी करण्याची मागणी केली होती.अनेक पुरुष नियमित आरोग्य तपासणी करत असले तरी प्रोस्टेटच्या आरोग्याचा विषय त्या तपासणीचा भागच नसतो. त्यामुळे ८४% पुरुष तपासणीपासून वंचित आहेत, त्यांना स्वतःच्या तपासणीबाबत माहिती नाही किंवा तपासणीची गरज वाटत नाही.यावरून पुरुषांना प्रोस्टेट कॅन्सरचा धोका आणि लवकर तपासणीचे महत्त्व समजावून सांगण्यासाठी अजूनही मोठ्या प्रमाणात जनजागृतीची गरज आहे. डॉक्टरांनी रुग्णाच्या वैयक्तिक धोक्याचा विचार करून योग्य मार्गदर्शन करणे आवश्यक आहे.६७% पुरुषांनी डॉक्टरांवर सर्वाधिक विश्वास असल्याचे सांगितले. मात्र फक्त ३६% पुरुषांनाच प्रोस्टेट कॅन्सरसाठी युरोलॉजिस्ट (मूत्ररोग तज्ज्ञ) योग्य डॉक्टर असल्याचे माहिती होते.४४% पुरुषांनी उपचार सुरू करण्यापूर्वी दुसऱ्या डॉक्टरांचा सल्ला घ्यायला आवडेल, असे सांगितले. यावरून उपचारांबाबत अधिक माहिती जाणून घेण्याची गरज असल्याचे दिसून आले.अनेक पुरुषांना प्रोस्टेटच्या आरोग्याबद्दल बोलणे अजूनही अवघड वाटते, असेही या सर्वेक्षणात आढळले.देशभरात ५९.५% पुरुषांनी डॉक्टरांशी प्रोस्टेट तपासणी किंवा उपचारांबाबत बोलताना अस्वस्थ वाटत असल्याचे सांगितले, तर फक्त १८% पुरुष स्वतःहून अशी चर्चा सुरू करतात.८४% पुरुष आरोग्यविषयक माहिती इंटरनेटवर शोधतात, तर ४८% पुरुषांनी कुटुंबीय किंवा मित्रांमुळे प्रोस्टेट कॅन्सरबाबत प्रथम माहिती मिळाल्याचे सांगितले.
अनेक पुरुष दरवर्षी आरोग्य तपासणी करत असले तरी प्रोस्टेट कॅन्सर तपासणीबाबत चर्चा झाली होती की नाही किंवा त्यांनी PSA चाचणी केली होती की नाही, हे त्यांना माहिती नसते.
(Disclaimer: वरील माहिती प्राप्त माहितीवर आधारित असून अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.