🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सकाळी उठल्यावर चेहरा सुजतोय? सावधान! शरीरात घर करतोय 'हा' भयानक आजार, अजिबात दुर्लक्ष करू नका!

सकाळी उठल्यावर चेहरा सुजतोय? सावधान! शरीरात घर करतोय 'हा' भयानक आजार, अजिबात दुर्लक्ष करू नका!


सकाळी झोपेतून उठल्यानंतर तुमचाही चेहरा सुजल्यासारखा दिसतो का? डोळ्यांच्या आजूबाजूला सूज, पापण्या जड वाटणे किंवा गाल फुगल्यासारखे वाटते का? मात्र, जर दररोज सकाळी चेहऱ्यावर सूज दिसत असेल किंवा त्यासोबत पाय सुजणे, लघवीत बदल होणे आणि सतत थकवा जाणवत असेल, तर या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका.

अनेकदा चेहऱ्यावरील सूज ही सामान्य समस्या समजली जाते. पण जर ती वारंवार होत असेल, तर त्यामागचं कारण जाणून घेणं गरजेचं आहे. काही वेळा किडनी, थायरॉइड किंवा इतर आरोग्याच्या समस्यांमुळेही चेहरा सुजू शकतो. ही समस्या टाळण्यासाठी कोणते उपाय करता येतील, ते जाणून घेऊया. 




सामान्यतः शरीरात जास्त प्रमाणात पाणी साचल्यामुळे सकाळी उठल्यावर चेहरा आणि डोळ्यांच्या आसपास हलकी सूज दिसू शकते. उठल्यानंतर काही वेळ हालचाल केल्यावर ही सूज कमी होते. जर असं कधीतरी होत असेल आणि इतर कोणतीही लक्षणं नसतील, तर काळजी करण्याचं कारण नसतं.

जास्त मीठ खाणे आणि झोपेची कमतरता
जर तुम्ही चिप्स, नमकीन, लोणचं, इन्स्टंट नूडल्स किंवा जास्त मीठ असलेले पदार्थ वारंवार खात असाल, तर शरीरात पाणी साचण्याची शक्यता वाढते. याचा परिणाम दुसऱ्या दिवशी सकाळी चेहऱ्यावर सूज येण्याच्या स्वरूपात दिसू शकतो. तसेच खूप कमी किंवा खूप जास्त झोप घेतल्यानेही डोळ्यांच्या आसपास सूज येऊ शकते. त्यामुळे संतुलित आहार आणि नियमित झोप घेणं महत्त्वाचं आहे. 
ॲलर्जी आणि सायनसची समस्या

सकाळी चेहऱ्यावर सूज येण्यामागे ॲलर्जी हेही एक कारण असू शकतं. अंथरुणातील धूळ, परागकण, पाळीव प्राण्यांचे केस किंवा त्वचेवर वापरण्यात येणारी काही उत्पादने यामुळे ॲलर्जी होऊ शकते. अशावेळी डोळ्यांना खाज येणे, डोळ्यातून पाणी येणे, शिंक येणे किंवा नाक बंद होणे अशी लक्षणंही दिसू शकतात. सायनसचा त्रास असल्यास डोळे आणि चेहऱ्याभोवती जडपणा जाणवू शकतो. एखादं नवीन स्किन केअर प्रॉडक्ट किंवा औषध वापरल्यानंतर सूज सुरू झाली असेल, तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.

किडनी आणि थायरॉइडचा आजार
जर चेहऱ्यावरील सूज वारंवार येत असेल आणि बराच काळ कायम राहत असेल, तर त्यामागे काही गंभीर आरोग्याच्या समस्या असू शकतात. किडनीच्या काही आजारांमध्ये शरीरातील अतिरिक्त पाणी आणि सोडियम बाहेर टाकण्याची क्षमता कमी होते. त्यामुळे डोळ्यांच्या आसपास किंवा शरीराच्या इतर भागांमध्ये सूज येऊ शकते. तसेच हायपोथायरॉइडिझम म्हणजेच थायरॉइड हार्मोनची कमतरता असल्यासही चेहरा सुजू शकतो.
चेहऱ्यावरील सूज कमी करण्यासाठी काय करावे?

रात्री जास्त मीठ असलेले आणि अतिप्रक्रिया केलेले (प्रोसेस्ड) पदार्थ खाणं टाळा.

दररोज पुरेशी आणि नियमित झोप घ्या.

सकाळी काही मिनिटे चेहऱ्यावर थंड पाण्याची पट्टी ठेवल्यास हलकी सूज कमी होण्यास मदत होऊ शकते.
झोपताना डोकं थोडं उंच ठेवून झोपल्यास काही लोकांमध्ये चेहऱ्यावर पाणी साचण्याचं प्रमाण कमी होऊ शकतं.

डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय सूज कमी करणारी किंवा शरीरातील पाणी कमी करणारी औषधं घेऊ नका.

(Disclaimer: वरील माहिती प्राप्त माहितीवर आधारित असून अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.