ध्रुव राठी प्रकरण तापले! विमानातून अभिजित दिपके, आशुतोष रांका आणि सौरभ दासह सीजेपी प्रमुख ताब्यात
दिल्लीमध्ये आज सीजेपीकडू जंतरमंतर 2.0 ची घोषणा करण्यात आल्यानंतर दिल्लीमध्ये अभूतपूर्व बंदोबस्त करण्यात आला आहे. सकाळपासूनच अनेकांची धरपकड सुरू असून दिल्ली पोलिसांकडून मारहाण झाल्याचा सुद्धा आरोप होत आहे.
या पार्श्वभूमीवर मुंबईतून दिल्लीकडे प्रस्थान केलेल्या अभिजीत दिपके, प्रवक्ते सौरभ दास आणि आशुतोष रांका यांना दिल्ली पोलिसांनी थेट विमानामध्ये घुसून ताब्यात घेतलं आहे. कोणत्याही स्थितीमध्ये जंतरमंतरवर आंदोलन करणारच असा निर्धार सीजीपीकडून करण्यात आला होता. मात्र, त्यापूर्वीच दिल्ली पोलिसांनी थेट विमान लँडिंग करण्यापूर्वीच विमानतळावर अभूतपूर्व बंदोबस्त ठेवत चक्क विमान गाठलं आणि विमानामध्येच अभिजीत दिपके, आशुतोष रांका आणि सौरभ दास यांना ताब्यात घेतलं आहे. ही आणीबाणी असल्याचा आरोप अभिजीत दिपके यांनी केला. ही हुकुमशाही असल्याचं अभिजीत दिपके यांनी म्हटलं आहे.
इतर प्रवाशांची सुद्धा एकच तारांबळ
अभिजीत दिपकेंना ताब्यात घेण्यासाठी पोलीस विमानामध्ये घुसताच इतर प्रवाशांची सुद्धा एकच तारांबळ उडाल्याचं दिसून येत आहे. ज्यावेळी विमानामध्ये पोलिसांनी घुसण्याचा प्रयत्न केला त्यावेळीच अभिजीत दिपके यांनी इन्स्टाग्राम लाईव्ह करत पोलीस आपल्याला अटक करण्यासाठी आल्याचं दाखवलं होतं. दुसरीकडे अभिजीत दिपके यांना अटक करण्यासाठी दिल्ली पोलिसांकडून महिला पोलिसांचं पथक पाठवण्यात आलं होतं. दिपके म्हणत होते की, आम्ही अटक होण्यासाठीच आलो आहोत आणि अशा पद्धतीने ताब्यात घेणे बरोबर नाही, असं म्हणत होते. मात्र, दिल्ली पोलिसांकडून त्यांना दिल्ली पोलिसांच्या महिला पथकाकडून त्यांना विनवणी करण्याचा प्रयत्न सुद्धा दिसून येत होता.
दुसरीकडे, दिल्लीत आंदोलनासाठी दिल्लीमध्ये पोहोचलेल्या ध्रुव राठीला सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. गुरुग्राममधील घरामध्ये साध्या वेशामध्ये पोलिसांनी फौजफाटा घुसून ध्रुव राठीला ताबात घेतल्यानंतर सीजीपीची लीगल टीमच्या हेड रत्ना सिंह यांना सुद्धा ताबात घेतलं आहे. दुसरीकडे जंतरमंतरवरती मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी व्हायला सुरू झाली असून तिथे सुद्धा पोहोचणाऱ्या जेनजीना पोलिसांकडून ताबात घेतलं जात आहे. दिल्लीत रस्त्यांवर पोलिस आणि पोलीसच दिसत आहेत अशी स्थिती झाली आहे. त्यामुळे कोरोना पद्धतीचा लॉकडाऊन लागला आहे का? अशी स्थिती दिल्लीमधील व्हायरल झालेला व्हिडिओमधून दिसून येत आहे. दिल्लीमध्ये जवळपास 38 ते 40 हजार पोलिसांचा फौजफाटा उतरवण्यात आला आहे. यामध्ये सीमा सुरक्षा करणारे जवान सुद्धा दिल्लीच्या रस्त्यांवरती शस्त्रधारी झाले आहेत. इतकी भयंकर परिस्थिती दिल्लीच्या रस्त्यांवरती दिसून येत आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.