🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

प्रलयंकारी चक्रीवादळाचे संकट! १४० च्या वेगाने धडकणार; हवामान विभागाचा 'रेड अलर्ट', शाळा-महाविद्यालयांना सुट्टी!

प्रलयंकारी चक्रीवादळाचे संकट! १४० च्या वेगाने धडकणार; हवामान विभागाचा 'रेड अलर्ट', शाळा-महाविद्यालयांना सुट्टी!


राज्यातील हवामानात बदल होताना दिसत आहे. त्यातच आता बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळामुळे आज विदर्भात पावसाची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात अर्णब चक्रीवादळाची निर्मिती झाली. तामिळनाडूच्या किनाऱ्यालगत बंगालच्या उपसागरात आणखी एक कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले. त्यामुळे वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस होईल. राज्यातील काही भागात पाऊस होण्याची शक्यता आहे. चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ या जिल्ह्यात धो धो पाऊस होईल. अर्णब चक्रीवादळात रूपांतर झाले. वादळी प्रणालीचे केंद्र अंदमान बेटांवरील विजयपीरमपासून 620 किलोमीटर ओडिशातील गोपाळपूर 580 किलोमीटर आणि आंध्र प्रदेशातील विखाशापट्टणम 610 किलोमीटर आग्रेयेकडे होते.




या चक्रीवादळाची तीव्रता चांगलीच वाढताना दिसत आहे. विशाखापट्टणम किनाऱ्यावर हे वादळ धडकेल. तेलंगणा, छत्तीसगड, बिहार, झारखंड, ओडिसा, आंध्र प्रदेश या भागात 124 ते 140 किलोमीटर वेगाने वारे वाहतील. अरबी समुद्राचे एक राैद्र रूप यावेळी बघायला मिळेल. या वादळीवाऱ्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून शाळांना आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली. अनेक भागात घरांचे मोठे नुकसान झाले.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.