🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

एलॉन मस्क यांची सर्वात मोठी पोस्ट! राहुल गांधींचे मानले आभार; म्हणाले, "भारतातील डिजिटल धोरण चिंताजनक!"

एलॉन मस्क यांची सर्वात मोठी पोस्ट! राहुल गांधींचे मानले आभार; म्हणाले, "भारतातील डिजिटल धोरण चिंताजनक!"


स्पेसएक्स, टेस्ला या कंपन्याचे सीईओ एलॉन मस्क यांनी स्टारलिंकला भारतात अडवलं जातंय असा आरोप तर केलाच पण त्यांनी थेट अंबानी यांचं नाव घेऊन आरोप केला. त्यानंतर या प्रश्नी राहुल गांधींनी जी पोस्ट केली त्या पोस्टला रिप्लाय देत एलॉन मस्क यांनी राहुल गांधींचे आभार मानले आहेत.

एलॉन मस्क यांचं म्हणणं नेमकं काय?
भारतात स्टारलिंक सेवा सुरू करण्यासाठी आवश्यक नियामक मंजुरींना उशीर होतो आहे. या विलंबावरूनच एलॉन मस्क आक्रमक झाल्याचं पाहण्यास मिळालं आहे. एक्स पोस्ट करत त्यांनी थेट रिलायन्स इंडस्ट्रीजचे मुकेश अंबानी यांच्यावर टीका केली आहे. एवढंच नाही तर अंबानी हे भारताचे खरे मालक आहेत का असा तिखट प्रश्नही उपस्थित केला आहे. एलॉन मस्क म्हणाले की स्टारलिंकला जगभरातल्या १६५ हून अधिक देशांनी परवाने दिले आहेत. भारतातले कायदे, तांत्रिक बाबी आणि इतर अटींचं पालन केलं जावं यासाठी कंपनीने पाच वर्षे खर्ची घातली आहेत तरीही सेवा सुरू होण्यास विलंब होतो आहे. स्टारलिंकच्या भारतातील प्रवेशाला काही ओलिगार्क्स म्हणजेच धनदांडगे उद्योजक अडथळा आणत असल्याचा आरोप केला होता. तर दुसरीकडे त्यांनी अंबानी यांचं नाव घेत टीका केली.
एलॉन मस्क यांच्या पोस्टवर राहुल गांधींनी काय म्हटलं आहे?

एलॉन मस्क यांच्या या पोस्टवर राहुल गांधी यांनी उत्तर देत Welcome to India, Elon Wait till You Dicover The Other Guy असं म्हटलं आहे. याच पोस्टवर रिप्लाय करत एलॉन मस्क यांनी राहुल गांधींचे आभार मानले आहेत आणि त्यांना थँक्यू म्हणत ही बाब खरंच चिंताजनक आहे असं म्हटलं आहे. एलॉन मस्क यांनी राहुल गांधींचे आभार मानल्याचं ट्वीट चर्चेत आलं आहे.

स्टारलिंकचं प्रकरण काय?
स्पेस एक्सच्या माध्यमातून जगभरात उपग्रह आधारित इंटरनेट क्रांती घडवून आणणारे अब्जाधीश उद्योगपती एलॉन मस्क यांना भारतात प्रवेश करणे अद्याप शक्य झालेले नाही. स्टारलिंक सॅटेलाईट इंटरनेट सेवा भारतात सुरू होण्यापूर्वीच नव्या नियामक आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या आव्हानांमध्ये अडकली. नियामक आणि इतर यंत्रणांशी अनेक वर्षे चर्चा करूनही स्टारलिंकच्या भारतातील प्रवेशाला उशीर होत असल्यामुळे एलॉन मस्क यांनी आता आक्रमक पवित्रा घेतला असल्याचे दिसत आहे. त्यांनी भारतातील दूरसंचार क्षेत्रातील एकाधिकारशाहीवर थेट टीका केली. आता या मुद्द्यावर सत्ताधारी पक्ष काही बोलणार का? एलॉन मस्क यांना उत्तर देणार का? हे पाहणं महत्त्वाचं असेल.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.