सावधान! खिशातील मोबाईल ठरतोय 'बॉम्ब'; तरुणाचा जागीच मृत्यू, चुकूनही करू नका या ५ गोष्टींकडे दुर्लक्ष!
आजकाल प्रत्येकाच्या हातात मोबाईल म्हणजेच स्मार्टफोन आहे. तंत्रज्ञानाच्या या युगात मोबाईल हा प्रत्येकाच्या आयुष्याचा अविभाज्य घटक झाला आहे. फोन लावण्यापासून ते अगदी बँकेच्या व्यवहारापर्यंत प्रत्येक गोष्टीसाठी मोबाईलचा वापर होते.
वेळ आणि श्रम या दोन्ही गोष्टींची बचत करत अनेक गोष्टी घरबसल्या करता येत असल्याने ही एक अशी सुविधा ज्याकडे दुर्लक्ष करुन चालत नाही. मात्र जर तुम्ही याकडे नीट लक्ष दिलं नाही, तर हेच जीवावरही बेतू शकतं हे दर्शवणारी एक घटना समोर आली आहे. मोबाईलचा स्फोट झाल्याने तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे.
उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरमध्ये मोबाईल फोनमुळे झालेल्या एका दुर्घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला. त्याच्या खिशात असलेला स्मार्टफोन अचानक स्फोट होऊन फुटला.
झालं असं की, 40 वर्षीय विकास अंताल आपल्या मोटारसायकलवरून घरी परतत असताना, त्याच्या खिशात असलेल्या मोबाईल फोनची बॅटरी फुटली. यामुळे त्याचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि तो खाली पडला. या अपघातात त्याला गंभीर दुखापत झाली आणि रुग्णालयात उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला.
जर तुम्हालाही अशा दुर्घटनेला सामोरं जायचं नसेल तर मोबाईलच्या बॅटरीकडे लक्ष देण्याची गरज आहे. मोबाईलमधून जर तुम्हाला हे 5 संकेत मिळत असतील तर त्याकडे चुकूनही दुर्लक्ष करु नका,
- स्मार्टफोनची बॅटरी फुटण्यापूर्वी किंवा तिला आग लागण्यापूर्वी काही धोक्याचे संकेत मिळतात.
1) मागच्या बाजूला फुगणे
जर तुमच्या स्मार्टफोनचा मागचा भाग (बॅक पॅनेल) फुगू लागला किंवा तिथे फट (गॅप) निर्माण झाली, तर याचा अर्थ असा की बॅटरीचे आयुष्य संपले आहे.
2) डिस्प्ले बाहेर येणे
काही स्मार्टफोनमध्ये डिस्प्ले बाहेरच्या दिशेला सरकू लागतो. हे देखील बॅटरी फुगल्याचे एक लक्षण आहे; अशा परिस्थितीत, बॅटरी बदलून घेण्यासाठी सर्व्हिस सेंटरला भेट द्यावी.
3) अति-गरम होणे
जर तुमचा मोबाईल फोन, सतत वापरत नसतानाही गरम होत असेल, तर याकडे दुर्लक्ष करू नका. विशेषतः जर असे वारंवार घडत असेल, तर त्वरित एखाद्या तंत्रज्ञाकडून किंवा सर्व्हिस सेंटरमध्ये जाऊन तो तपासून घ्या.
4) विचित्र वास
जर तुमच्या स्मार्टफोनमधून अचानक जळल्याचा किंवा इतर कोणताही असामान्य वास येऊ लागला, तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. डिव्हाइस त्वरित एखाद्या तंत्रज्ञाकडे घेऊन जा.
5) चुकीच्या चार्जरचा वापर
स्मार्टफोन चार्ज करण्यासाठी वारंवार चुकीच्या चार्जरचा वापर केल्यास बॅटरीचे नुकसान होते. अनेकदा लोक जास्त वॅटेज (हाय-वॅटेज) असलेले चार्जर वापरतात, जे धोकादायक ठरू शकते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.