🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

अंड्यांचे फायदे जाणून फक्त विकत घेऊ नका; अंडी ताजी आहेत की जुनी? 'या' ३ पद्धतींनी ओळखा

अंड्यांचे फायदे जाणून फक्त विकत घेऊ नका; अंडी ताजी आहेत की जुनी? 'या' ३ पद्धतींनी ओळखा


अंडी खाणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. विशेषतः व्यायाम करायला जाणारी मंडळी शरीराला प्रथिने मिळवण्यासाठी अंडी खातात. एका मध्यम आकाराच्या उकडलेल्या अंड्यामध्ये (सुमारे ५० ग्रॅम) अंदाजे ७८ कॅलरीज, ६ ते ७ ग्रॅम उच्च-गुणवत्तेची प्रथिने आणि ५ ग्रॅम आरोग्यदायी फॅट्स असतात.

त्यात व्हिटॅमिन डी, ए, ई, बी१२ आणि अनेक खनिजे देखील असतात. पण, अंड्यांचे फायदे मिळवण्यासाठी ते ताजे असणेही महत्त्वाचे आहे. बाजारातून आणलेली अंडी जुनी किंवा खराब असण्याची शक्यता असते. केवळ अंड्याच्या बाहेरील कवचाकडे पाहून ते ताजे आहे की जुने, हे नेहमीच ओळखता येत नाही. मात्र, अंड्याची ताजेपणा आणि गुणवत्ता तपासण्यासाठी काही सोपे मार्ग आम्ही तुम्हाला नक्कीच सांगू शकतो. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (FSSAI) यूट्यूबवर अंड्याच्या गुणवत्तेबद्दल एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात घरी सहजपणे अंड्याची गुणवत्ता कशी ठरवायची याबद्दल स्पष्ट केले आहे.

१. एका ग्लासात पुरेसे पाणी भरा आणि त्यात हळूवारपणे अंड सोडा. जर अंड ग्लासच्या तळाशी बुडून पूर्णपणे आडवे झाले, तर ते साधारणपणे ताजे असल्याचे मानले जाते. ताज्या अंड्यांमध्ये हवेची पोकळी खूपच लहान असते. त्यामुळे त्यांचे वजन तुलनेने जास्त असते आणि ती पाण्यात तळाशी बुडतात.

२. दुसरा एक मार्ग म्हणजे, जर अंडे पाण्याच्या तळाशी बुडाले आणि त्याचे टोक वर राहिले, तर ते जुने असू शकते. कालांतराने, अंड्याच्या आतील आर्द्रता आणि वायू बदलतात आणि हवेची पोकळी विस्तारते, ज्यामुळे अंडे पूर्णपणे सपाट दिसण्याऐवजी सरळ किंवा तिरके दिसते.

३. याशिवाय, जर अंडे पाण्याच्या पृष्ठभागावर तरंगत असेल, तर ते जुने झाल्याचे किंवा सडल्याचे लक्षण असू शकते. अंडे वापरण्यापूर्वी ते फोडून त्याचा वास आणि आतील स्थिती तपासणे देखील महत्त्वाचे आहे. ज्या अंड्याला दुर्गंध येत असेल, रंग असामान्य असेल किंवा पोत वेगळा असेल, ते अंडे वापरणे टाळावे. अशा प्रकारे, अंडे जुने, ताजे किंवा सडलेले आहे की नाही हे ठरवण्यासाठी तुम्ही घरी पाण्याचा वापर करू शकता.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.