🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

​"एक दिवस सगळ्यांना मरायचंय, पण..." हे वाक्य थाम्बवलंही नाही; क्रॉसखाली दबून पादरीचा जागीच मृत्यू!

​"एक दिवस सगळ्यांना मरायचंय, पण..." हे वाक्य थाम्बवलंही नाही; क्रॉसखाली दबून पादरीचा जागीच मृत्यू!


क्विटो:  इक्वोडोरमध्ये संध्याकाळी प्रार्थना सभेत जमलेल्या लोकांना संबोधित करत असतानाच एका दुर्घटनेत चर्चेच्या पादरीचा मृत्यू झाला आहे. ही प्रार्थना सभा लाईव्ह स्ट्रिमिंग सुरू होते. त्यावेळी अचानक त्यांच्या मागील बाजूस असलेला क्रॉस खाली कोसळला आणि तो पादरी यांच्यात डोक्यात पडला. या घटनेतील मृत पादरीचे नाव पेट्रिसियो सांचेज असं होते. जगभरात या दुर्घटनेचा व्हिडिओ आता व्हायरल होत आहे.

शनिवारी रात्री घडलेल्या या घटनेचे फुटेज समोर आले आहे. त्यात दिसतंय की, पादरी यांच्या डोक्यावर पाठीमागील क्रॉस पडतो आणि ते तिथे खाली पडतात. ही घटना घडताच चर्चेमधील लोक जोरात ओरडतात. त्यांच्या मदतीसाठी धावतात. पण या दुर्दैवी घटनेत पादरी यांचा मृत्यू होतो. सांचेझ हे 'कॉन्ग्रेगेशन ऑफ द मोस्ट होली रिडीमर' नावाच्या रोमन कॅथोलिक धार्मिक पंथाचे सदस्य होते, ज्याची स्थापना १७३२ मध्ये झाली होती आणि ते जगभरातील ८० देशांमध्ये कार्यरत होते.




डोक्याला क्रॉस लागल्याने मृत्यू

ग्वायाकिलमधील स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, एक पादरी वेदीमागे उभे राहून प्रार्थना सभेत उपस्थित असलेल्या लोकांशी बोलत असताना अचानक त्यांच्यावर क्रॉस पडला. या अपघातात ते गंभीर जखमी झाले आणि त्यांना उठता आले नाही. अनेक लोक त्यांच्या मदतीसाठी धावून आले आणि त्यांनी रुग्णवाहिका बोलावली. बचाव पथकाने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले, जिथे त्यांना मृत घोषित करण्यात आले.

विशेष म्हणजे हा एक विचित्र योगायोग होता की अपघाताच्या काही क्षणांपूर्वीच धर्मगुरूंनी मृत्यूविषयी भाष्य केले होते. आपल्या प्रवचनात त्यांनी येशू ख्रिस्ताच्या वचनाचा उल्लेख केला आणि त्यांनी आपले आयुष्य फोन स्क्रोल करत वाया घालवू नये तर आपला वेळ देव आणि आपल्या प्रियजनांसाठी समर्पित करावा असं त्यांनी सभेत उपस्थित असलेल्यांना सांगितले. एक दिवस आपल्या सगळ्यांना मरायचंय, कधी कधी आपण अशा गोष्टींमध्ये वेळ घालवतो, ज्याला फार महत्त्व नसते या वाक्यानंतर काही क्षणांनी चर्चेमध्ये दुर्घटना घडली आणि त्यांचा जीव गेला.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.