🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मोक्काचा बडगा! सांगली हादरवणारी 'एन.जी. ग्रुप' गँग पोलिसांच्या जाळ्यात; जत फायरींग आणि खंडणी प्रकरणातील ९ गुन्हेगार मोक्काच्या कचाट्यात

मोक्काचा बडगा! सांगली हादरवणारी 'एन.जी. ग्रुप' गँग पोलिसांच्या जाळ्यात; जत फायरींग आणि खंडणी प्रकरणातील ९ गुन्हेगार मोक्काच्या कचाट्यात


सांगली: सांगली जिल्ह्यामध्ये डोके वर काढणाऱ्या आणि नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या कुख्यात 'एन.जी. ग्रुप' (निलेश गडदे संघटित गुन्हेगारी टोळी) विरोधात सांगली पोलिसांनी अत्यंत आक्रमक आणि ठोस पाऊल उचलले आहे. जत पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेला गंभीर खंडणी आणि फायरींगचा परवाना रद्द करत, या गुन्ह्यात आता महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोक्का) १९९९ ची कडक कलमे लावण्यात आली आहेत. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मा. श्री. रंजन कुमार शर्मा यांनी या प्रस्तावाला मंजुरी देत सांगली जिल्ह्यातील संघटित गुन्हेगारीचा कणा मोडून काढला आहे.

​गुन्ह्याचा घटनाक्रम आणि टोळीची दहशत:

​जत पोलीस ठाण्यात (गुन्हे नोंद क्र. ३३९/२०२६) दाखल असलेल्या गुन्ह्यात, भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम ३०८(४), ३३३, ३५१(२), ३५२, ३(५), शस्त्र अधिनियम आणि महा. पोलीस कायद्याच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सांगलीचे सहा. पोलीस निरीक्षक राजेंद्र यादव यांनी या प्रकरणाचा सखोल तपास केला. 




​तपासात निष्पन्न झाले की, मुख्य आरोपी तथा टोळी प्रमुख निलेश विठोबा गडदे (वय २७, रा. कुपवाड) याने आपल्या इतर साथीदारांना एकत्र करून 'एन.जी. ग्रुप' नावाची संघटित गुन्हेगारी टोळी तयार केली होती. सन २०१७ पासून ते २०२६ पर्यंत सांगली शहर, मिरज, कुपवाड, जत आणि आष्टा परिसरामध्ये या टोळीने सतत खुनाचा प्रयत्न, दुखापत, अपहरणाची भीती दाखवून खंडणी उकळणे, बेकायदेशीर घातक शस्त्रे व अग्निशस्त्र बाळगणे आणि नागरिकांमध्ये दहशत पसरवणे असे गंभीर गुन्हे केले आहेत. आर्थिक फायदा आणि स्वतःचे वर्चस्व निर्माण करणे हा यामागचा मुख्य हेतू होता. 

मोक्काअंतर्गत कारवाईचे बळ:

​या गुन्ह्यातील आरोपी तांत्रिक मुद्द्यांचा आधार घेऊन कायद्याच्या कचाट्यातून निसटण्याच्या प्रयत्नात होते. मात्र, सांगली पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हा सरकारी अभियोक्ता यांच्या अभिप्रायानुसार या टोळीविरुद्ध मोक्का अंतर्गत कारवाईचा प्रस्ताव तयार करण्यात आला.

​पोलीस प्रशासनाने हा प्रस्ताव मा. विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र, कोल्हापूर यांच्याकडे सादर केला. मा. श्री. रंजन कुमार शर्मा यांनी या प्रस्तावाचे गांभीर्य लक्षात घेऊन गुन्ह्यातील एकूण ०९ आरोपींवर मोक्का कायद्यातील कलमांचा अंतर्भाव करण्यास मंजुरी दिली.

​मोक्याच्या जाळ्यात अडकलेले ९ कुख्यात आरोपी:

निलेश विठोबा गडदे (टोळी प्रमुख, रा. कुपवाड)
​सॅन्डी ऊर्फ संदेश रामचंद्र घागरे
​अभीषेक जितेंद्र भोरे
​दाजी राजाराम गडदे
​अजित आबासाहेब दुधाळ
​संभा ऊर्फ सुकुमार भागाप्पा माने (रा. जत)
​किरण शंकर लोखंडे
​मलिक सलिम शेख
​राजेंद्रसिंग बडवानीसिंग टकराना ऊर्फ पाजी (रा. मध्य प्रदेश - परागंदा)

​पुढील तपास आणि पोलिसांचा कडक इशारा:

​सदर गुन्ह्याचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी, जत उपविभाग सचिन थोरचोले यांच्याकडे वर्ग करण्यात आला आहे. ​या कारवाईमुळे सांगली जिल्ह्यातील गुन्हेगारी वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, अशा प्रकारे संघटित गुन्हेगारी करणाऱ्या टोळ्यांवर यापुढे अत्यंत बारीक नजर ठेवली जाईल आणि त्यांना कायदेशीररीत्या कायमस्वरूपी उखडून टाकण्यासाठी कोणतीही कसुरी सोडली जाणार नाही.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.