कोल्हापूर :- कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) निवडणुकीत प्रशासनाच्या सुरक्षा व्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचे समोर आले आहे. मतदान केंद्रात मोबाईल नेण्यास सक्त बंदी असतानाही, काही ठरावधारकांनी यंत्रणेची नजर चुकवून मोबाईल आत नेले आणि थेट मतपत्रिकेवर कोणाला मतदान केले याचे फोटो काढून ते समाजमाध्यमांवर व्हायरल केले आहेत. या गंभीर प्रकारामुळे मतदानाची गोपनीयता ऐरणीवर आली असून, निवडणूक प्रशासनाच्या कारभारावर तीव्र संशय व्यक्त होत आहे.
सुरक्षा यंत्रणेला चुना:
मोबाईल बंदीचे नियम पायदळी तुडवत सुमारे २५ हून अधिक ठरावधारकांनी मतदान केंद्रातूनच आपले फोटो आणि कोणाला मत दिले हे दर्शवणाऱ्या क्लिप्स सोशल मीडियावर पसरवल्या.
गोपनीयतेचा बोजवारा: सहकारी निवडणुकीत प्रत्येक मताला महत्त्व असते, मात्र यंत्रणेच्या डोळ्यांसमोर हा प्रकार घडल्याने मतदानाची गोपनीयता धोक्यात आली आहे.
कर्तव्यदक्षतेवर प्रश्नचिन्ह: मतदान केंद्रात मोबाईल आत गेला कसा? आणि फोटो काढत असताना सुरक्षेसाठी तैनात असलेले अधिकारी व कर्मचारी काय करत होते? असा संतप्त सवाल आता उपस्थित होत आहे.
विक्रमी मतदान:
एकीकडे सुरक्षेचा फज्जा उडाला असला, तरी दुसरीकडे सायंकाळी ४:३० वाजेपर्यंत तब्बल ९९.७४ टक्के (५,४१८ पैकी ५,४०४) विक्रमी मतदान नोंदवले गेले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.