🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पोलीस दलाला मोठा धक्का! साताऱ्यातील कॉन्स्टेबलचा पोलादपूरमध्ये मृत्यू

पोलीस दलाला मोठा धक्का! साताऱ्यातील कॉन्स्टेबलचा पोलादपूरमध्ये मृत्यू


सातारा पोलीसदलातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. साताऱ्यातील एका पोलीस कर्मचाऱ्याने आपलं जीवन संपवल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे संपूर्ण पोलीस दलात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संतोष ननावरे असं या पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे. त्यांचं वय 36 वर्ष होतं. ते मूळचे वाई तालुक्यातील ओझर्डे गावचे राहणारे होते. सध्या ते भुईंज महामार्ग पोलीस मदत केंद्रात कॉन्स्टेबल म्हणून काम करत होते. ही घटना पोलादपूर येथे आहे. 

पोलादपूरमधील एका हॉटेलमध्ये ते थांबले होते आणि तिथेच त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं. शुक्रवारी सकाळी ही गोष्ट समोर आली. हॉटेलमधील कर्मचाऱ्यांना जेव्हा याची माहिती मिळाली तेव्हा त्यांनी लगेच पोलादपूर पोलिसांना कळवलं. 

पोलिसांनी काय कारवाई केली?
घटनेची माहिती मिळताच पोलादपूर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करण्यात आला. त्यानंतर सातारा पोलिसांचं पथक पण पोलादपूरला पोहोचलं. मृतदेह ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.36 वर्षाच्या तरुण पोलीस कर्मचाऱ्याने असं पाऊल का उचललं याबद्दल सगळ्यांनाच प्रश्न पडला आहे. त्यांच्या आत्महत्येमागचं नेमकं कारण अजून समोर आलेलं नाही.
आत्महत्येमागचं कारण काय?

पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. ही कौटुंबिक कारणातून घडलेली घटना आहे का, की कामाच्या तणावातून त्यांनी हे पाऊल उचललं याचा तपास केला जात आहे. पोलीस दलात कामाचा ताण खूप असतो. त्यातून पण असं काही घडलं का याचा पण विचार केला जात आहे.काही ठिकाणी वरिष्ठांकडून त्रास होत होता का, अशी पण चर्चा केली जात असून ही फक्त चर्चा असल्याचे सांगण्यात येत आहे. अजून कोणतंही कारण अधिकृतरित्या समोर आलेलं नाही. पोलिस त्यांच्या कुटुंबीयांशी आणि सहकाऱ्यांशी बोलून माहिती घेत आहेत. त्यांच्या मोबाईलची पण तपासणी केली जात आहे. 

पोलीस दलात शोककळा
संतोष ननावरे हे गेल्या अनेक वर्षांपासून पोलीस दलात काम करत होते. त्यांच्या अशा अचानक जाण्याने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पोलीस दलात पण सगळे सुन्न झाले असून एक चांगला कर्मचारी अचानक निघून गेल्यामुळे हळहळ व्यक्त होत आहे.या घटनेने पुन्हा एकदा पोलीस कर्मचाऱ्यांच्या मानसिक आरोग्याचा प्रश्न समोर आला आहे.

पोलीस कर्मचाऱ्यांवर कामाचा खूप ताण असतो. दिवस-रात्र ड्युटी, सुट्टी नाही, कुटुंबाला वेळ देता येत नाही. त्यामुळे अनेक कर्मचारी तणावात असतात.सरकारने आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पोलीस कर्मचाऱ्यांच्या मानसिक आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. त्यांच्यासाठी समुपदेशनाची गरज आहे.या प्रकरणाचा पुढील तपास पोलादपूर पोलीस आणि सातारा पोलीस करत आहेत. तपासानंतरच खरं कारण समोर येईल.जर तुम्हाला किंवा तुमच्या ओळखीच्या कोणाला अशा प्रकारचा ताण जाणवत असेल तर एकटं राहू नका. कुटुंबाशी बोला, मित्रांशी बोला किंवा जवळच्या सरकारी दवाखान्यात मदत घ्या.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.