🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

​"समाजातला खोटेपणा आता उफाळून आलाय!"; गांधी जयंतीच्या कार्यक्रमात अभिनेते नसरुद्दीन शाह यांची जळजळीत टीका

"समाजातला खोटेपणा आता उफाळून आलाय!"; गांधी जयंतीच्या कार्यक्रमात अभिनेते नसरुद्दीन शाह यांची जळजळीत टीका


“सत्ताधाऱ्यांची खोटी आश्वासने आणि खोटेपणाचा परिणाम जनतेवर का होत नाही, याची मला कित्येक वर्षे चिंता होती मात्र तो परिणाम आता प्रेशर कुकरप्रमाणे बाहेर पडला असून त्याला जेन झीचे आंदोलन निमित्त ठरले,” अशा शब्दांत ज्येष्ठ अभिनेते नसरुद्दीन शाह यांनी सध्याच्या राजकीय व्यवस्थेवर टीकास्त्र सोडले.

देशाच्या राजकारणात अधिकाधिक चारित्र्यवान आणि सुशिक्षित तरुणांचा सक्रिय सहभाग वाढण्याची गरज असल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले. कॉकरोच जनता पार्टीचे अभिजित दिपके यांनी त्यांना बोलते केले.

गांधी जयंतीच्या निमित्ताने शुक्रवारी तारा, पनवेल येथील युसूफ मेहरअली सेंटरमध्ये सुरू झालेल्या ‘फेस्टिव्हल ऑफ अल्टरनेटिव्हज’च्या उद्घाटनप्रसंगी शाह बोलत होते. २ ते ४ ऑक्टोबरदरम्यान होणाऱ्या या महोत्सवात सामाजिक बदल, पर्यावरण, शाश्वत विकास, ग्रामीण उपजीविका आणि पर्यायी विकासविषयक विचारांवर चर्चा, परिसंवाद व विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 

राजकारणातील तरुणांच्या सहभागाचा मुद्दा उपस्थित करताना शाह म्हणाले, “खूप वर्षे उलटून गेली तरी देशाच्या राजकारणात तरुणांचा असा सक्रिय सहभाग दिसून आलेला नाही. युसूफ मेहरअली सेंटरच्या अध्यक्षा सोनल शाह यांच्या अध्यक्षतेखाली उद्घाटन सोहळा झाला. ज्येष्ठ गांधीवादी नेते तुषार गांधी, सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर, कॉकरोच जनता पार्टीचे अध्यक्ष अभिजित दिपके यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.