🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगली ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई: समडोळीतील रेकॉर्डवरील गुन्हेगार विनायक पुजारी सांगली जिल्ह्यातून एका वर्षासाठी हद्दपार​

सांगली ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई: समडोळीतील रेकॉर्डवरील गुन्हेगार विनायक पुजारी सांगली जिल्ह्यातून एका वर्षासाठी हद्दपार


सांगली :- सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार विनायक दत्तात्रय पुजारी (वय ३९, रा. रामनगर समडोळी, ता. मिरज, जि. सांगली) याच्यावर महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ५६ (१) (अ) (ब) नुसार कारवाई करत त्याला संपूर्ण सांगली जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे.


संशयित विनायक पुजारी याच्यावर सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात शरीराविरुद्धचे गंभीर गुन्हे आणि अमली पदार्थांशी संबंधित गुन्हे दाखल आहेत. त्याच्याकडून पुन्हा शरीराविरुद्धचे गुन्हे घडण्याची शक्यता निर्माण झाल्याने, सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. अभिजीत देशमुख यांनी त्याच्या हद्दपारीचा प्रस्ताव उपविभागीय दंडाधिकारी (मिरज उपविभाग) यांच्याकडे सादर केला होता. ​सदर प्रस्तावावर सुनावणी पूर्ण करून उपविभागीय दंडाधिकारी श्री. विशाल यादव यांनी विनायक पुजारी यास सांगली जिल्ह्याच्या स्थळसीमा हद्दीतून एका वर्षासाठी हद्दपार करण्याचा आदेश जारी केला आहे.


ही धडक कारवाई सांगलीचे पोलीस अधीक्षक श्री. तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती कल्पना बारावकर आणि शहर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. संदीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यामध्ये सांगली ग्रामीणचे पोलीस निरीक्षक अभिजीत देशमुख, गुन्हे अन्वेषण पथकातील श्रेणी पोलीस उपनिरीक्षक अरुण औताडे, सहाय्यक पोलीस फौजदार मेघराज रुपनर, पोलीस हवालदार बंडू पवार आणि अभिजीत पाटील यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. ​पोलीस प्रशासनाच्या या कठोर कारवाईमुळे परिसरातील गुन्हेगारांचे धाबे दणाणले असून, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अशी कारवाई पुढेही सुरूच राहील, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.