🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

अभियंत्यांनो सावधान! हिंजवडीत खड्ड्यांमुळे अपघात घडल्यास थेट गुन्हा दाखल; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचा इशारा

अभियंत्यांनो सावधान! हिंजवडीत खड्ड्यांमुळे अपघात घडल्यास थेट गुन्हा दाखल; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचा इशारा


पुणे : हिंजवडी परिसरातील रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासाठी दिलेली ३० सप्टेंबरची मुदत संपूनही कामे अपूर्ण आहेत. त्यामुळे या खड्ड्यांमुळे अपघात झाल्यास पीएमआरडीएच्या कार्यकारी अभियंत्यावरआणि ठेकेदारावर थेट गुन्हा दाखल करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डुडी यांनी दिले. उर्वरित खड्डे बुजविण्याचे काम कोणत्याही परिस्थितीत पुढील सात दिवसांत पूर्ण करण्याची अंतिम मुदत देण्यात आली. या वेळी डुडी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.

चाकण-हिंजवडी परिसरातील कामाबाबत डुडी यांनी उच्चस्तरीय टास्क फोर्स समितीच्या माध्यमातून आढावा घेतला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, पोलिस उपायुक्त विक्रांत देशमुख यांच्यासह एमआयडीसी, महापालिका, पोलिस, महामार्ग आणि संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. 

बैठकीत हिंजवडीतील रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. ३० सप्टेंबरपर्यंत खड्डे बुजविण्याचे निर्देश यापूर्वीच देण्यात आले होते. मात्र, मुदत संपल्यानंतरही कामे पूर्ण झालेली नसल्याने उर्वरित कामे सात दिवसांत पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले. खड्ड्यांमुळे अपघात झाल्यास त्याची जबाबदारी पीएमआरडीएच्या कार्यकारी अभियंत्यावर निश्चित करून थेट गुन्हा दाखल करण्यास डुडी यांनी सांगितले.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.