सचिन पिळगांवकर आणि सुप्रियापिळगांवकर यांच्या मुलीचं नाव श्रिया असून त्यांनी एकामुलीला दत्तकही घेतलेलं. पण, नंतर तीच त्यांना सोडून गेली. श्रियाच्या जन्माच्या एक–दोन वर्षे आधी सचिन यांनी यामुलीला दत्तक घेतलेलं . पण , ती मुलगी मोठी झाली अन् तिनं सचिन आणि सुप्रिया यांच्यावर आरोप केले होते . एका मुलाखती दरम्यान सचिन यांनी त्या मुलीचा उल्लेख केला होता . करिष्मा मखानी असं या मुलीचं नाव असून ती चांगल्या घरातील मुलगी होती . तिचे वडील लंडनमधील एका रेस्टॉरंटचे मालक होते.
पण त्यांची पत्नी म्हणजेच करिष्माची आई सतत आजारी असायची. करिष्माचे वडील आणि सचिन यांच्यात चांगली मैत्री होती. करिष्माच्या वडिलांनी तिला हॉस्टेलमध्ये ठेवण्याचा निर्णय घेतला. पण, हे सचिनआणिसुप्रिया यांना पटलं नाही. सचिन यांनी करिष्माला दत्तक घेण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी करिष्मा तीन–चार वर्षांची होती.
सचिन आणि सुप्रिया यांनी करिष्माचं उत्तम पालन पोषण केलं, तिला लाडाकोडात वाढवलं. तसेच सचिन यांनी करिष्माला इंडस्ट्रीत कामही दिलं. मात्र, एकेदिवशी करिष्माचे वडील अचानक मुंबईत आले आणि तिला लंडनला घेऊन दिले. यासगळ्याचा सचिन यांना मोठा धक्का बसला. सचिन यांनी करिष्माच्या वडिलांवर किडनॅपिंगचा आरोप केला. पण, एकामुलाखतीत करिष्मा म्हणालेलीकी, ‘ते माझे वडील होते, मी त्यांच्यासोबत गेले, किडनॅपिंग चा काही प्रश्न नाही.’
काही वर्षानंतर करिष्मा इंडस्ट्रीत काम करण्यासाठी मुंबईत आली. तिनंसचिनआणिसुप्रियायांच्याकडेमदतमागितली. दोघांनीही तिला मोठ्यामनानं माफ केलं. सहा–सात महिने करिष्मा सचिनआणिसुप्रियायांच्यासोबत राहत होती. पण, इंडस्ट्रीत तिचं नाव फार संचाललं नाही. त्यानंतर करिष्मानं पुन्हा लंडनची वाट धरली.दरम्यान, सचिन पिळगांवकर यांनी त्यांच्या आत्मचरित्रात या प्रकरणाचा उल्लेख केला आहे. जिला आई–वडिलांचं प्रेम दिलं, तिनेच आमच्यावर गंभीर आरोप केले. ज्याल मित्रमानलं त्यानेच आमची आर्थिक फसवणूक केली, असं सचिन यांनी त्यांच्या पुस्तकात म्हटलं आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.