🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगली-मिरज रस्त्यावर खळबळ! निवृत्त पोलीस उपनिरीक्षकाला मध्यरात्री फिल्मी स्टाईल मारहाण; व्हिडिओ व्हायरल होताच तरुणाच्या बापाने जोडले हात!​

सांगली-मिरज रस्त्यावर खळबळ! निवृत्त पोलीस उपनिरीक्षकाला मध्यरात्री फिल्मी स्टाईल मारहाण; व्हिडिओ व्हायरल होताच तरुणाच्या बापाने जोडले हात!


सांगली :- सांगली-मिरज रस्त्यावरील वाचन कॉलेजसमोर मध्यरात्री एक अत्यंत संतापजनक आणि खळबळजनक प्रकार समोर आला आहे. रस्त्यावर थांबलेल्या एका निवृत्त पोलीस उपनिरीक्षकाला अज्ञात तरुणांनी धिंगाणा घाजत बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. या मारहाणीचा लाईव्ह व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल झाल्यानंतर प्रचंड संताप व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे, पोलिसी खाक्यात आयुष्यभर गुन्हेगारांवर वचक ठेवणाऱ्या निवृत्त अधिकाऱ्यालाच असा लाथा-बुक्क्यांनी तुडवल्याचे समोर आल्याने पोलीस वर्तुळातही तीव्र पडसाद उमटले आहेत.

​व्हिडिओ व्हायरल होताच बापाने टेकले गुदग्या!

​ही विकृत मारहाण करून पसार झालेल्या तरुणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर धिंगाणा घालू लागताच, संबंधितांचे धाबे दणाणले. पोलिसांत तक्रार दाखल करण्यासाठी गेलेल्या त्या निवृत्त अधिकाऱ्याची थेट पोलीस ठाण्यात किंवा मध्यरात्रीच गाठ घेऊन संबंधित तरुणाच्या वडिलांनी आणि कुटुंबीयांनी थेट हात जोडून माफी मागितली. "आमच्या पोराकडून चूक झाली, माफ करा," असे म्हणत त्यांनी आपली दिलगिरी व्यक्त केली आणि प्रकरणावर पडदा पाडण्याचा केविलवाणा प्रयत्न केला.





​नेमकं कारण काय? पोलीस प्रशासनाची भूमिका गूढ!

​एका निवृत्त पोलीस अधिकाऱ्याला रस्त्यावर अशा प्रकारे धिंगाणा घालून मारहाण करण्याचे धाडस कुणाचे झाले?  यामागचे मूळ कारण अद्याप गुलदस्त्यात आणि अत्यंत अस्पष्ट आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात कोणतीही अधिकृत गुन्ह्याची नोंद  करण्यात आली नव्हती. मात्र, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आणि खुद्द निवृत्त अधिकारी तक्रारीसाठी पुढे आल्यावर पोलीस प्रशासन आता नेमकी काय कारवाई करणार? याबाबत तीव्र उत्सुकता आणि संताप नागरिकांमधून व्यक्त होत आहे. मारहाणीमागचे खरे सत्य समोर आणून त्या उद्धट तरुणावर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरत आहे.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.