🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

जरांगे पाटलांचा ५०० कोटींचा ऑडिओ बॉम्ब! राजकारणात हायव्होल्टेज ड्रामा सुरू

जरांगे पाटलांचा ५०० कोटींचा ऑडिओ बॉम्ब! राजकारणात हायव्होल्टेज ड्रामा सुरू

मनोज जरांगे पाटील यांनी आज (गुरुवार, 22 ऑकटोबर) पत्रकार परिषद घेत एक खळबळजनक ऑडिओ क्लिप ऐकवली.

या ऑडिओ क्लिपमध्ये अनेक गंभीर आणि खळबळजनक आरोप करण्यात आले असून श्रीकांत शिंदे यांच्यामार्फत जरांगेना 500 कोटी रुपये पोहचवले असल्याचा दावा करण्यात आला आहे. जरांगे पाटलांनी दसरा मेळाव्यात सुद्धा हा आरोप केला होता. त्यानंतर आज पत्रकार परिषद घेत त्यांनी हा ऑडिओ बॉम्ब फोडला.

जरांगे पाटलांनी ऐकवलेल्या या ऑडिओ क्लिपमुळे राज्यात राजकीय वातावरणात एकाच खळबळ उडाली आहे. या आरोपांनंतर शिंदे गटाच्या नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. कथित ऑडिओ क्लिपची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी शिंदे गटाकडून करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन चौकशीची मागणी करण्याची तयारी शिंदे गट करणार आहे.

नेमका 500 कोटींचा आरोप काय?

मनोज जरांगे पाटील यांनी या कथित ऑडिओ क्लिपच्या संदर्भात भाजपकडून 500 कोटी रुपये घेऊन ते आपल्यापर्यंत पोहोचवल्याची चर्चा नेमकी कशाच्या आधारावर सुरू झाली, असा सवाल उपस्थित केला. शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून पैसे दिल्याचा दावा या क्लिपमध्ये करण्यात आला आहे. यावरूनच आक्रमक पवित्रा घेत जरांगेंनी या प्रकरणाचा छडा लावण्याचा निर्धार व्यक्त केला. तसेच, या आरोपांमागचं सत्य समोर आलं पाहिजे, अशी भूमिका घेतली.

शिंदे गटाची फडणवीसांकडे धाव

या आरोपांनंतर शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. कथित क्लिपची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी शिंदे गटाकडून करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन चौकशीची मागणी करण्याची तयारी असल्याचंही सांगितलं जात आहे.

मंत्री उदय सामंत यांनीही या प्रकरणावर प्रतिक्रिया dयेत, “ऑडिओ क्लिप खरी असेल तर ही गंभीर बाब आहे. क्लिप कोणी व्हायरल केली आणि त्यातील आवाज कोणाचा आहे, याची तपासणी झाली पाहिजे,” अशी मागणी त्यांनी केली.

नरेश म्हस्के आणि नितेश राणेंची प्रतिक्रिया

खासदार नरेश म्हस्के यांनीही क्लिपची फॉरेन्सिक तपासणी करण्याची गरज व्यक्त केली. आरोपांची सत्यता तपासल्यानंतरच वस्तुस्थिती स्पष्ट होईल, अशी शिंदे गटाची भूमिका आहे. दुसरीकडे, भाजप नेते नितेश राणे यांनी जरांगेंच्या आरोपांवर टीका केली. केवळ चर्चा किंवा ऐकीव माहिती म्हणजे पुरावा होत नाही, असे म्हणत त्यांनी जरांगे पाटलांच्या ऑडिओ क्लिपवर आक्षेप आहे.

आता चौकशीतून काय समोर येणार?

जरांगे पाटलांनी सादर केलेल्या कथित ऑडिओ क्लिपमुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. आरोप, प्रत्यारोप आणि चौकशीची मागणी यामुळे या प्रकरणाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. आता संबंधित क्लिपची सत्यतेबाबत तपासातून काय समोर येते, हे महत्त्वाचं ठरणार आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.