🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

खाकीचा निष्कृष्ट चेहरा! पत्नीच्या शरीरसुखाच्या बदल्यात जन्मठेपेचा कैदी सोडला; वरिष्ठ DIG अधिकाऱ्याच्या कारनाम्याने पोलीस दल हादरलं!

खाकीचा निष्कृष्ट चेहरा! पत्नीच्या शरीरसुखाच्या बदल्यात जन्मठेपेचा कैदी सोडला; वरिष्ठ DIG अधिकाऱ्याच्या कारनाम्याने पोलीस दल हादरलं!


बंगळुरू मध्यवर्ती कारागृहाच्या माजी मुख्य अधीक्षकावर जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या कैद्याच्या पत्नीने गंभीर आरोप केला आहे. नवऱ्याची तुरुंगातून सुटका करण्याच्या मोबदल्यात तुरुंग अधिकाऱ्याने आपलं लैंगिक शोषण केलं असा आरोप तिने केला आहे. कारागृहाचा हा माजी मुख्य अधीक्षक सध्या कारागृह आणि सुधार सेवा विभागात डीआयजी म्हणून कार्यरत आहे. शंकर या कैद्याची सुटका केली, त्यावेळी श्री सोमशेखर माजी मुख्य अधीक्षक होते. 2018 सालचं हे प्रकरण आहे. 

सर्वोच्च न्यायालयाच्या बनावट आदेशाच्या आधारे ही सुटका करण्यात आली. नवऱ्याची सुटका करण्याच्या मोबदल्यात सोमशेखर यांनी आपलं लैंगिक शोषण केलं असा आरोप शंकरच्या पत्नीने पोलीस तपासात केला. जन्मठेपेची शिक्षा भोगणारा शंकर 13 नोव्हेंबर 2018 साली बंगळुरु मध्यवर्ती कारागृहातून कसा बाहेर आला, याचा तपास पोलीस करत होते. सर्वोच्च न्यायालयाचा आदेशाने तो बाहेर आल्याचं समजल्यानंतर पोलिसांनी तपास केला. त्यात सर्वोच्च न्यायालयाचा तो आदेशच बनावट असल्याचं लक्षात आलं. 

कैदी शंकरच्या सुटकेसाठी तुरुंगातच काम करणारा कर्मचारी श्रीकांतने सुप्रीम कोर्टाचा बनावट आदेश बनवल्याचा आरोप पोलिसांनी केला. श्रीकांत शिक्षाप्राप्त कैदी विभागात एसडीए म्हणून काम करतो. शंकरच्या सुटकेमध्ये सोमशेखरने काय भूमिका बजावली त्याचा पोलीस तपास करत आहेत. शंकरच्या पत्नीने सोमशेखर यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केलाय. सोमशेखर यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. पण ते चौकशीत सहकार्य करत नसल्याचं पोलिसांनी सांगितलं. प्रकरणाशी संबंधित माहिती लपवून ठेवली. सोमशेखर यांना कोर्टात हजर करण्यात आलं. पुढील चौकशीसाठी त्यांना पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

बनावट आदेश काढला कसा

2004 साली चिकपेट पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेल्या प्रकरणात फास्ट ट्रॅक कोर्टाने शंकर यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. उच्च न्यायालयाने ही शिक्षा कायम ठेवली. सुप्रीम कोर्टाचा बनावट आदेश काढला कसा यावर सध्या पोलिसांनी तपास केंद्रीत केला आहे. जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या कैद्याची अशी सुटका होणं ही एक अत्यंत गंभीर बाब आहे.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.