मिरज :- बेकायदेशीर गोवामेड दारूची मोठी गाडी पकडल्यानंतर लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करून आरोपींना पोलीस कस्टडीत घेण्याची गरज असताना, अवघी साधी नोटीस देऊन त्यांना सोडून देण्याचा प्रकार मिरज राज्य उत्पादन शुल्क विभागात उघडकीस आला आहे. या धक्कादायक प्रकारामुळे संपूर्ण सांगली जिल्ह्यात आणि उत्पादन शुल्क विभागात एकाच खळबळ उडाली असून संबंधित अधिकाऱ्याच्या संशयास्पद कारभाराची तीव्र चर्चा सुरू झाली आहे.
आरोपींना ताब्यात घेऊन या बेकायदेशीर दारू तस्करांच्या मुळापर्यंत पोहोचणे अत्यंत आवश्यक होते. मात्र, आरोपींवर कठोर कारवाई करण्याऐवजी अवघ्या एका नोटीसवर त्यांना अभय कोणी आणि का दिले? यामागे मोठा आर्थिक व्यवहार झाला आहे का? असा थेट सवाल आता उपस्थित केला जात आहे. या प्रकारानंतर संबंधित अधिकाऱ्याची तात्काळ सखोल चौकशी करून त्याला सेवेतून बडतर्फ करावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
मागील कारवायांचीही चौकशी होणार का?
सदर वादग्रस्त अधिकाऱ्याच्या कामगिरीवर यापूर्वीही अनेकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. याआधी त्यांनी केलेल्या अशाच प्रकारच्या संशयास्पद कारवायांची आणि गुन्ह्यांचीही वरिष्ठांकडून सखोल चौकशी व्हायला हवी, अशी दबक्या आवाजात चर्चा खुद्द याच कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये सुरू आहे.
आयुक्त महोदय दखल घेणार का?
गोव्याच्या दारूची उघड तस्करी करणाऱ्यांवर मेहेरबानी दाखवणाऱ्या या अधिकाऱ्याच्या मनमानी कारभाराची आता राज्य उत्पादन शुल्क आयुक्त आणि वरिष्ठ पातळीवर दखल घेतली जाणार का? की या गंभीर प्रकरणावर पडदा टाकला जाणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, या अधिकाऱ्याने आजवर केलेल्या सर्व प्रकरणांची चौकशी करण्याची मागणी आता समाजमाध्यमांतून देखील आक्रमकपणे केली जात आहे.
क्रमश.......
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.